✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Birthday Special : 'मस्त-मस्त गर्ल' रविना टंडनचा 46वा वाढदिवस; आगामी चित्रपट 'केजीएफ 2'मधील लूक व्हायरल

एबीपी माझा वेब टीम   |  26 Oct 2020 12:36 PM (IST)
Birthday Special : 'मस्त-मस्त गर्ल' रविना टंडनचा 46वा वाढदिवस; आगामी चित्रपट 'केजीएफ 2'मधील लूक व्हायरल
1

वाढदिवसाच्या निमित्ताने रविनाने 'केजीएफ चॅप्टर 2' या आगामी चित्रपटातील लूक रिविल केला आहे. याचा फोटो रविनाने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. (credit : @officialraveenatandon)

2

रविना टंडन सुपरस्टार यश स्टारर 'केजीएफ चॅप्टर 2'मध्ये दिसून येणार आहे. याआधी 2017 मध्ये आलेल्या 'मातृ' या चित्रपटात रविना दिसून आली होती. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत होती.

3

रविना टंडन आज 46 वर्षांची झाली आहे. परंतु, आजही आपल्या सौंदर्याने आणि अदांनी ती नवख्या अभिनेत्रींना मागे टाकते. रविनाचा नो-मेकअप लूक फार प्रसिद्ध आहे.

4

रविना टंडन लग्नाआधी सिंगल मदर झाली होती. तिने दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. त्यानंतर तिने फिल्म डिस्ट्रीब्यूटर अनिल थठानीसोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर तिला एक मुलगा आणि एक मुलगी झाली.

5

रविना टंडन आणि अक्षय कुमार यांनी बराच काळ एकमेंकाना डेट करत होते. मोहरा चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतरही त्यांनी एकत्र अनेक चित्रपट केले.

6

रविना टंडनने 1991 मध्ये 'पत्थर के फूल' या चित्रपटात अभिनेता सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यु केला होता. चित्रपट फारसा गाजला नाही. परंतु, या चित्रपटातील रविनाच्या अभिनयाचं कौतुक करण्यात आलं होतं.

7

अक्षय कुमार व्यतिरिक्त सुपरस्टार गोविंदा आणि रविना या जोडीलाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. दोघांनी दुल्हेराजा, अखियों से गोली मारे, बडे मिया छोटे मिया यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

8

रविना टंडन 1994 मध्ये आलेला चित्रपट 'मोहरा' या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आली. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारसोबत तिने स्क्रिन शेअर केली होती. या चित्रपटातील 'तू चीज बडी है मस्त मस्त' हे गाणं प्रचंड गाजलं. तसेच या गाण्यातील रविनाच्या सौंदर्याने चाहत्यांना भूरळ घातली. तेव्हापासूनच रविनाला 'मस्त-मस्त गर्ल'चा टॅग चाहत्यांनी दिला.

9

90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडनचा आज 46वा वाढदिवस. आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या काळजाचा ठाव घेणारी रविना आजही आपल्या सौंदर्याने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बॉलिवूड
  • Birthday Special : 'मस्त-मस्त गर्ल' रविना टंडनचा 46वा वाढदिवस; आगामी चित्रपट 'केजीएफ 2'मधील लूक व्हायरल
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.