PHOTO| मिथिला पालकर, अनेकांच्या हृदयावर राज्य करणारी 'गर्ल इन द सिटी'
मिथिला सध्या अजय देवगनच्या प्रोडक्शनच्या त्रिभंगा या नेटफ्लिक्स चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. या चित्रपटात काजोलही दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 15 जानेवारीला प्रदर्शित होतोय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमिथिलाला 2016 साली पिच परफेक्ट आणि अन्ना केंड्रिकच्या 'कप सॉन्ग' च्या तिच्या स्वत:च्या व्हर्जनमुळे एक वेगळी ओळख मिळाली. 'तुझी चाल तुरु तुरु' या तिच्या गाण्याला तीन दशलक्ष पेक्षा जास्त व्यूज मिळाले होते.
मिथिला युट्यूब वेब सीरीज 'गर्ल इन द सिटी' मध्ये दिसली. यात साकारलेल्या भूमिकेमुळे तिने अनेकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं होतं. ती अनेक मराठी शॉर्ट फिल्म आणि वेब सीरीजमध्ये झळकली आहे.
त्यानंतर मिथिला 'लिटल थिंग्ज' या वेब सीरीजमध्ये प्रेक्षकांच्या समोर आली होती. काव्या कुलकर्णी नावाची भूमिका साकारणाऱ्या मिथिलाला यामुळे खूप लोकप्रियता मिळाली.
डिजिटल प्लेटफॉर्मच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी मिथिला पालकर आज आपला 28 वा जन्मदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 1993 साली मुंबईत झाला.
मिथिलाने आपल्या कारवां या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
मिथिलाने आपल्या अभिनयाची सुरुवात 2014 साली मराठी शॉर्ट फिल्म 'माझा हनीमून' मधून केली होती. ही शॉर्ट फिल्म मुंबई फिल्म फेस्टिवल मध्ये दाखवण्यात आली होती.
मिथिलाने वयाच्या 12 व्या वर्षापासूनच नाटकात काम करायला सुरुवात केली. ती कथक या भारतीय नृत्य शैलीमध्ये निपूण आहे.
सुंदर अभिनय करणारी, कुरळ्या केसांची मिथिला पालकर आपल्या वेगवेगळ्या अभिनयाच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत असते. तिचा आज वाढदिवस आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -