Guru Gobind Singh Jayanti 2021 | खालसा दलाची स्थापना करणारे आणि त्यागाचा संदेश देणारे शिखांचे दहावे धर्मगुरु, गुरु गोविंद सिंह
गुरु गोविंद सिंहजी यांनी 42 वर्षापर्यंत शत्रूविरुद्ध सामना केला होता. 1708 मध्ये त्यांनी नांदेड येथील सचखंड परिसरातआपला देह त्यागला. त्याच परिसरात सचखंड गुरुद्वारा आहे. शीख समाजात गुरु गोविंद सिंहांची जयंती ही प्रकाशपर्व म्हणून साजरी केली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुरु गोविंद सिंग दररोज गुरुवाणीचे पठण करून आपल्या भक्तांना व अनुयायांना त्याचा सविस्तर अर्थ सांगत असत. तेव्हा त्यांचे लहान भाऊ मनी सिंहजी ते लिहीत असत. असं सांगितलं जातं की सलग पाच महिने लिखाण करुन गुरुवाणी पूर्ण करण्यात आली होती.
धर्म व समाजाच्या संरक्षणासाठी गुरु गोविंद सिंह यांनी 1699 मध्ये खालसा पंथाची स्थापना केली. खालसा पंथाच्या माध्यमातून त्यांनी जातीय भेद नष्ट करुन समानता प्रस्थापित केली. शीख बांधवामध्ये आत्म-सन्मानाची भावना वाढीस लावण्याचे महत्वपूर्ण काम श्री गुरु गोविंद सिंग यांनी केले.
शिखांचे नववे गुरु तेगबहादुर यांच्यानंतर श्री गुरु गोविंद सिंह हे 11 नोव्हेंबर 1675 रोजी शिखांचे दहावे गुरु म्हणून गादीवर विराजमान झाले.
शिखांचे दहावे गुरु, गुरु गोविंद सिंहांनी 1699 साली बैसाखीच्या दिनानिमित्त खालसा पंथाची स्थापना केली होती. त्यावेळी त्यांना गुरु गोविंद सिंह हे नाव मिळालं त्यांनी जीवनभर अन्याय, अधर्म, अत्याचाऱ्याच्या विरोधात लढा दिला.
श्री गुरु गोविंद सिंगजी यांचा जन्म 1666 मध्ये पाटना येथे गुजरीजी व श्री गुरु तेगबहादुरजी यांच्या गरीब कुटुंबात झाला होता. त्यावेळी गुरु तेगबहादुरजी बंगालमध्ये होते. गुरु गोविंद सिंह यांचे मुळ नाव गोविंद राय असे ठेवण्यात आले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -