चार महिन्यांचा झाला हार्दिक पांड्याचा मुलगा अगस्त्य; आई नताशाचं सेलिब्रेशन
भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचने आपल्या मुलाला चार महिने पूर्ण झाल्यानंतर सेलिब्रेशन केलं. यानिमित्ताने नताशाने आपल्या मुलासबोतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहणारी नताशा नेहमीच आपल्या मुलासोबत फोटो शेअर करत असते. तिने याआधीबी आपल्या मुलासोबतचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला होता. जो लोकांना फआर आवडला होता.
नताशा अगस्त्यच्या जन्मापासून दर महिन्याला त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. यावेळीही अगस्त्यने वयाची चार वर्ष पूर्ण केल्यानंतर तिने सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हार्दिक पांड्या सध्या भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तो संघासोबत पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये भारतात परतणार आहे. यादरम्यान हार्दिक आणि नताशाचा मुलगा अगस्त्यने आपल्या वयाचे चार महिने पूर्ण केले आहेत.
नताशा एक मॉडल आणि अभिनेत्री आहे. तिने 'सत्याग्रह' आणि 'फुकरे' रिटर्न्समध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत.
हार्दिक पांड्याने नताशा स्टॅनकोविचसोबत 1 डिसेंबर रोजी साखरपुडा केला होता. त्यानंतर मे महिन्यात नताशाने आपल्या प्रेग्नेंसीची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. तर 30 जुलै रोजी नताशाना अगस्त्यला जन्म दिला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -