Rafale Fighter Jet | राफेल लढाऊ विमानं फ्रान्सहून भारताकडे झेपावली!
चीन आणि पाकिस्तानसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही लढाऊ विमाना भारताकडे येण्यासाठी रवाना होणं ही अतिशय महत्त्वाची बाब समजली जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराफेल लढाऊ विमानांनी फ्रान्सच्या मेरिजनाकहून उड्डाण केलं. भारतीय हवाई दलाने यासाठी संपूर्ण योजना तयार केली आहे. मार्गात ही लढाऊ विमानं अनेक देशांच्या सीमेवरुन भारताच्या जामनगर इथे पोहोचतील.
फ्रान्सपासून भारतापर्यंतच्या संपूर्ण प्रवासादरम्यान राफेल विमानांचा वेग जवळपास ताशी 1000 किमी इतका असेल. महत्त्वाची बाब म्हणजे राफेलचा सर्वाधिक वेग हा ताशी 2222 किमी एवढा आहेत.
अत्याधुनिक क्षेपणास्त्र आणि घातक शस्त्रास्त्रांनी सज्ज सर्वात शक्तिशाली लढाऊ विमान राफेलने आज फ्रान्सहून भारताच्या दिशेने उड्डाण केलं आहे. एकूण पाच राफेल विमानं आज भारताच्या दिशेने झेपावली आहेत. चीन आणि पाकिस्तानसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही लढाऊ विमाना भारताकडे येण्यासाठी रवाना होणं ही अतिशय महत्त्वाची बाब समजली जात आहे.
फ्रान्सवरुन उड्डाण केलेल्या राफेल विमानाचा पहिला थांबा अबुधाबीमधील अल धाफरामधील विमानतळ इथे असेल. सुमारे दहा तासांच्या या प्रवासादरम्यान विमान आकाशात असतानाच इंधन भरण्यासाठी दोन विमानं सोबत असतील.
रात्रभर तिथे थांबल्यानंतर ही विमानं भारतासाठी रवाना होतील. यावेळी दोन वेळा हवेत असतानाच इंधन भरलं जाईल. वैमानिकांना विमान हवेत असतानाच इंधन भरण्याचीही ट्रेनिंग दिलं आहे.
भारतात येणारे राफेल लढाऊ विमानांमध्ये जगाातील सर्वात आधुनिक हवेतून हवेत मारा करणारी मिटीऑर क्षेपणास्त्रही आहेत.
ही विमानं 29 जुलै रोजी अंबालाच्या एअर बेसमध्ये सामील केले जातील. या विमानांच्या उड्डाणांसाठी एकूण 12 वैमानिकांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. जगातील सर्वात घातक क्षेपणास्त्र आणि सेमी स्टील्थ तंत्रज्ञान असलेली ही विमानं भारतीय हवाई दलात सामील झाल्याने देशाच्या सामरिक शक्तीत वाढ होणार आहे.
भारतात पोहोचल्यानंतर ही विमाना अंबाला एअरफोर्स स्टेशन इथे दाखल होतील. राफेलची पहिली पाच विमानं 17 गोल्डन एरो स्क्वॉड्रनचे वैमानिक उडवणार असून यासाठी त्यांचं प्रशिक्षणही पूर्ण झालं आहे.
राफेल विमानं रवाना होण्यासाठी फ्रान्समधील भारतीय दूतावासाने या राफेल विमानांची आणि भारतीय हवाई दलाच्या जाबांज वैमानिकांचे फोटो शेअर केले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -