Photos: शेतकरी आंदोलन ठिकाणी लागल्या लोखंडी सळ्या, सुरक्षा कवचासह स्टीलच्या काठ्या घेऊन दिल्ली पोलिस सज्ज
प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. यावेळी दिल्लीत बर्याच ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. या हिंसाचारात सुमारे 400 लोक जखमी झाले. त्यानंतर, आदोलनाची परिस्थिती बदलली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतीच सिंघू सीमेवर झटापटीवेळी SHO अलीपूर जखमी झाला होता. यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र, दिल्ली पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार हे फोटो अधिकृतपणे जाहीर झालेले नाहीत.
दिल्ली पोलिसांनी आपल्या जवानांना स्टीलची काठी आणि हातात संरक्षण कवच दिले आहे.
हा फोटो टिकरी सीमेवरील आहे. जेथे शेतकरी आंदोलनापासून थोड्या अंतरावर रस्त्यावर लोखंडी रॉड बसविण्यात आले आहेत. जेणेकरुन लोकांचे येणेजाणे थांबेल.
सोमवारी, सिंघू बॉर्डरवर दिल्लीकडून कमी आंदोलक दिसले. परंतु, हरियाणाकडून मोठ्या संख्येने लोक होते. नवीन कृषी कायद्यांविरोधात जोरदार भाषणे केली जात होती. या आंदोलनासाठी एकी दाखवण्याचे आवाहन केलं जात आहे.
शेतकरी आंदोलनाचे मुख्य ठिकाण असलेल्या सिंघू सीमेवर तात्पुरती भिंत उभारली गेली आहे. नुकतीच सिंघू बॉर्डरवर स्थानिक असल्याचा दावा करणारे शेतकरी आणि काही लोक यांच्यात झटापट झाली होती.
दिल्लीच्या सीमेवर शेतकर्यांच्या आंदोलनाचा आज 68 वा दिवस आहे. सिंघू, गाझीपूर आणि टिकरी सीमेवर शेतकरी तीन नवीन कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी ठाण मांडून बसले आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आंदोलनाला रोखण्यासाठी वेगवेगळे प्रबंध केलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -