Oscars 2022 : सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून विल स्मिथ ऑस्करने पुरस्कृत, अष्टपैलू आहे 'फ्रेश प्रिन्सची' कारकिर्द

विल स्मिथ

1/10
अभिनेता, निर्माता, रॅपर अशा एक न अनेक कलांमध्ये तरबेज असणाऱ्या विल स्मिथला नुकतच यंदाचा ऑस्कर्स पुरस्कर मिळाला आहे.
2/10
अभिनेता विल स्मिथला 'किंग रिचर्ड' (King Richards) या चित्रपटासाठी बेस्ट अॅक्टर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार घेताना त्याला गहिवरुन आलं होतं.
3/10
विल सर्वात आधी हिप हॉप गाण्यांमुळे प्रसिद्धीस आला. त्याने बालपणीचा मित्र जेफरीसोबत मिळून सर्वात आधी एक हीप हॉप ड्यओ बॅन्ड तयार करत अल्बम्स तयार केले.
4/10
अभिनय क्षेत्रात विलला सर्वात आधी छोट्या पडद्यावर प्रसिद्धी मिळाली. त्याने द फ्रेश प्रिन्स बेल एअर या टीव्ही सिरीयलमध्ये केलेल्या अभिनयामुळे ९० च्या दशकात त्याची लोकप्रियता तुफान वाढली. त्यासाठी त्याला काही पुरस्कार देखील मिळाले.
5/10
त्यानंतर बॅड बॉईस या 1995 साली प्रदर्शित झालेल्या अॅक्शन फिल्ममधून मोठ्या पडद्यावरही विलने त्याचा दबदबा निर्माण केला. यानंतर बॅड बॉयस 2 (2003) मधून त्याने पुन्हा एकदा अॅक्शनचा धडाकेबाज परफॉरमन्स सर्वांना दाखवला. 
6/10
मेन इन ब्लॅक या फिल्म सिरीजमधील विलची एजंट जेची भूमिका भारतीयांमध्ये त्याला लोकप्रिय करण्यात सर्वात यशस्वी ठरली. मेन इन ब्लॅकच्या तिन्ही पार्टमध्ये विलने दमदार अभिनय केला.  
7/10
हॉलीवुडमधील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक असणाऱ्या द परस्युट ऑफ हॅपिनेस  (The Pursuit of Happyness) या 2006 साली प्रदर्शित चित्रपटाने जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांना विलच्या अॅक्शन व्यतीरिक्त अभिनयाची ओळख करुन दिली.
8/10
विलने अभिनेत्री शिरे हिच्यासोबत 1992 साली लग्न केलं. पण 3 वर्षात म्हणजेच 1995 मध्ये त्याने तिच्यापासून वेगळं होत जेडा पिंकेटसोबत लग्नगाठ बांधली.
9/10
दरम्यान विल आणि  शिर यांना एक मुलगा असून तोही अभिनेता आहे. ट्रे स्मिथ असं त्याचं नाव आहे.
10/10
तर जेडा आणि विल यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. जेडन असं मुलाचं तर विलो असं मुलीचं नाव आहे.
Sponsored Links by Taboola