Pakistani Uorfi Javed PHOTO: पाकिस्तानच्या उर्फी जावेदला ओळखता का? बिकनीमधील फोटो, लिप-लॉकचे फोटो केलेले शेअर, तुम्ही पाहिलेत?

आता चाहत्यांना पाकिस्तानची उर्फी जावेद सापडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मम्या शजाफरला लोक पाकिस्तानी उर्फी जावेद म्हणून ओळखतात. मम्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज काहीतरी शेअर करत असते.

पाकिस्तानी इंफ्लुएंसर आणि मॉडेल माम्या शजाफर तिच्या बोल्ड फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.
ज्याप्रमाणे भारताची उर्फी जावेद तिच्या आगळ्या वेगळ्या स्टाईनं सर्वांना हैराण करते आणि नेहमी तिच्या ड्रेसिंग स्टाईलमध्ये वेगवेगळे प्रयोग करत राहते, त्याचप्रमाणे मम्याही तेच करते. यामुळे तिला पाकिस्तानची उर्फी जावेद म्हटलं जाते.
मम्यानं तिचे बिकिनीमधले फोटो अनेक वेळा शेअर केले आहेत. त्यानंतर तिला खूप ट्रोल करण्यात आलं. पण आता ट्रोलिंगमुळे तिला फारसा फरक पडत नाही.
पाकिस्तानमध्ये कपडे आणि समाजाला जास्त महत्त्व दिलं जातं. ज्यामुळे मम्याला सामान्य पाश्चात्य कपडे परिधान केल्याबद्दलही टीकेचा सामना करावा लागतो.
मम्या कदाचित पहिली पाकिस्तानी अभिनेत्री किंवा इंफ्लुएंसर असेल जिनं लिप-लॉक करताना तिचा फोटो शेअर केला असेल. त्यानंतरही तिला काही फरक पडला नाही.
ती ट्रोलिंगपेक्षा मुक्तपणे आयुष्याचा आनंद घेण्यावर विश्वास ठेवते. यामुळे, तिला कोण काय बोलतं? याची पर्वा कधीच नसते आणि ती दररोज तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत राहते.
मम्याची ही शैली भारतीयांनाही खूप पसंत केली जाते. मम्याचे भारतातही अनेक चाहते आहेत, जे तिचं कौतुक करण्याचं थांबवत नाहीत.