Photo : Vicky Kaushal आणि Katrina Kaif कुठे घेणार सात फेरे?

विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाबाबत अनेक प्रकारच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. अलीकडेच एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, विकी आणि कतरिना डिसेंबरमध्ये सात फेरे घेणार आहेत. आता त्यांच्या लग्नाच्या ठिकाणाबाबत बातम्या येत आहेत. हे जोडपे 700 वर्ष जुन्या किल्ल्यात लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
हा किल्ला अतिशय भव्य आहे. आत प्रवेश करताच जुन्या राजे-सम्राटांच्या ऐश्वर्याची आठवण होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफ राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये लग्न करू शकतात.
किल्ल्याचे रूप अतिशय प्रेक्षणीय आहे. गडाचे प्रांगण खूप मोठे आणि भव्य असल्याचे सांगितले जाते.
या किल्ल्याच्या आत एक रॉयल स्पा देखील असल्याचे सांगितले जाते. या किल्ल्यात अनेक जुनी मंदिरे आहेत.
हे असे ठिकाण आहे जेथे पाहुण्यांना पारंपारिक आणि आधुनिक अशा दोन्ही गोष्टींचा अनुभव मिळेल. या ठिकाणचे सौंदर्य पाहून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल.
किल्ल्याचा आतील भाग अतिशय नेत्रदीपक पद्धतीने बनवला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफ यांना त्यांचे लग्न अविस्मरणीय व्हावे अशी इच्छा आहे. यामुळेच हे जोडपं सातशे वर्ष जुन्या या गडावर सात फेऱ्या मारण्यासाठी सज्ज झाले आहे
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाबाबत आधी बातमी आली होती की दोघेही परदेशी हॉटेलमध्ये लग्न करणार होते,
पण मीडिया रिपोर्ट्सनुसार या सुंदर किल्ल्यात लग्न होणार असं बोललं जात आहे. (सर्व फोटो सोशल मीडिया)