In Pics : शिर्के-पाटील कुटुंबात पुन्हा लगीनघाई!
Sukh Mhanje Nakki Kay Asta : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया मालिकेत जयदीप आणि गौरी यांचा विवाहसोहळा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. माई आणि दादांच्या इच्छेखातर जयदीप आणि गौरी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधणार आहेत.
शिर्के-पाटील कुटुंबात एखादा सण समारंभ असो वा कोणतंही शुभकार्य ते थाटातच पार पडतं. त्यामुळे जयदीप-गौरीचं लग्न देखील अगदी थाटात पार पडणार आहे.प्री-वेडिंग फोटोशूट, मेहंदी, हळद, वरात आणि लग्न हे सर्व समारंभ साजरे करण्यात येणार आहेत.
प्री-वेडिंग फोटोशूटसाठी जयदीप-गौरीसह संपूर्ण शिर्के-पाटील कुटुंबाने रेट्रो लूक केला आहे. जयदीप काशिनाथ घाणेकर आणि गौरी आशा काळे यांच्या लूकमध्ये दिसणार आहेत. तर उदय आणि देवकी दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांच्या लूकमध्ये दिसतील.
शेखरने अभिनेता अशोक सराफ आणि रेणुकाने अभिनेत्री रंजना यांचा लूक प्री-वेडिंग फोटोशूटसाठी केलाय. तर मल्हारने दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे लूक केला. माई आणि दादा हे सुद्धा 70च्या दशकातल्या कलाकरांच्या लूकमध्ये दिसणार आहेत तर अम्मा दिसणार आहे अभिनेत्री ललिता पवार यांच्या लूकमध्ये.
संपूर्ण शिर्के-पाटील कुटुंब या प्री-वेडिंग फोटोशूटच्या निमित्ताने हटके अंदाजात दिसणार आहेत.