PHOTO: हेअरकट अन् पिवळं टीशर्ट, रुपाली भोसलेचा लूक पाहून तुम्हालाही आली का ‘अशी ही बनवाबनवी’ची आठवण?
‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ‘संजना’ म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले तिच्या वेगवेगळ्या लूक्ससाठी नेहमीच चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही दिवसांपूर्वीच रुपालीने तिचा वेगळ्या लूकमधला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. रुपालीने हा लूक नेमका कशासाठी केला आहे, याची तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती.
या फोटोमागचं खरं रहस्य आता समोर आलं आहे. रुपालीचा हा अनोखा अंदाज पाहायला मिळणार आहे प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यामध्ये.
‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमातील ‘हृदयी वसंत फुलताना’ या गाण्यावर रुपाली परफॉर्म करणार आहे.
याच परफॉर्मन्साठी रुपालीने सुप्रिया पिळगावकर यांच्या सिनेमातील लुकशी मिळताजुळता लूक करण्याचा प्रयत्न केला आहे.
या परफॉर्मन्ससाठी रुपाली अतिशय उत्सुक असून असा हटके प्रयोग तिने पहिल्यांदाच केला आहे.
सुप्रसिद्ध अभिनेता भूषण प्रधानसोबत रुपाली या सदाबहार गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.
रुपालीचा हा हटके अंदाज ‘प्रवाह पिक्चर पुरस्कार 2022’ सोहळ्यात रविवार 16 ऑक्टोबरला सायंकाळी 7 वाजता स्टार प्रवाह आणि प्रवाह पिक्चर वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. (फोटो : @rupalibhosle/IG)