PHOTO: ‘कौन कहता है की आपकी तस्वीर बात नहीं करती…’, प्राजक्ता माळीच्या साडी लूकवर चाहते झाले फिदा!
नुकतीच देशभरात नवरात्र अतिशय जल्लोषात साजरी करण्यात आली. नऊ दिवसांचा हा उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसामान्य लोकांसह कलाकारदेखील गरबा खेळण्यात रमले होते. मात्र, या दरम्यानच्या काळात अभिनेत्री प्राजक्ता माळी लंडनमध्ये चित्रीकरणात व्यस्त होती.
आता प्राजक्ता लंडनहून परतली असून, नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी या सणाच्या जल्लोषात सामील झाली होती.
नुकतेच तिने या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती नवरात्रीचा आनंद लुटताना दिसत आहे.
‘नवरात्रीचा एकच दिवस साजरा करता आला, पण सगळी कसर भरून काढली’, असं गंमतीदार कॅप्शन तिने दिले आहे.
‘कौन कहता है कि आपकी तस्वीर बात नहीं करती…!!! हर सवाल का जवाब देती है बस आवाज़ नहीं करती…!!’ असं म्हणत चाहत्यांनी तिच्या फोटोंचं कौतुक केले आहे.
‘गुलाबाची नाजूक कळी’, ‘सुंदर दिसतेयस’, असं म्हणत चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
मराठी मनोरंजन विश्वातील ही आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo : @prajakta_official/IG)