Madhavi Nimkar: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील माधवी निमकर आहे फिटनेस फ्रीक; जाणून घ्या अभिनेत्रीबद्दल
सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेत अभिनेत्री माधवी निमकर शालिनी ही भूमिका साकारते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशालिनी ही भूमिका साकारणारी माधवी निमकर ही खऱ्या आयुष्यात फार वेगळी आहे. ती मल्टी टॅलेंटेड असून फिटनेस फ्रीक अभिनेत्री आहे.
माधवी ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. माधवी ही वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. माधवी योगा देखील करता.
माधवी ही अनेक वेळा फणसातील गरे काढणे, चुल पेटवणे यांसारखी कामं करतानाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर करते. अभिनयक्षेत्रात काम करत असतानाच माधवी ही इतर कामं देखील आवडीनं करते.
माधवी ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. माधवीला इन्स्टाग्रामवर 430K फॉलोवर्स आहेत.
अनेक वेळा माधवी ही सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते.
. काही दिवसांपूर्वी माधवीनं एक व्हिडीओ शेअर केला होता, त्यामध्ये दिसत होते की, माधवी ही शूटिंग दरम्यान क्रिकेट खेळत आहे.
माधवीच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात.
माधवी तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.