In Pics : Sukh Mhanje Nakki Kay Asta मालिकेतील 'हा' सीन करण्यासाठी मंदार जाधव लटकला झाडाला
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिका सध्या अतिशय रंजक वळणावर पोहोचली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'भूमिकेसाठी कायपण' म्हणत मालिकेतील कलाकार अवघड सीन करताना दिसून येत आहेत. नुकताच अभिनेता मंदार जाधव झाडाला लटकलेला दिसून आला आहे.
मालिकेत सध्या कबड्डीच्या सामन्याचे आकर्षण आहे. कबड्डी प्रशिक्षकाचा शोध घेण्यासाठी जयदीप जंगलात गेला असताना भलत्याच संकटात सापडला आहे. झाडाला लावलेल्या फासात त्याचा पाय अडकला आणि तो उलटा टांगला गेला आहे.
अवघ्या काही मिनिटांच्या या सीनसाठी जयदीपची भूमिका साकारणाऱ्या मंदार जाधवने बरीच मेहनत घेतलेली दिसून येते.
4-5 तास या भागाचं शूटिंग सुरू होतं. हा सीन शूट करणं खूप अवघड होतं. तसचं जबाबदारीचंदेखील होतं.
फाईट मास्टर आणि दिग्दर्शकांच्या सुचनांचे पालन करीत तसेच सेटवरील सर्व मंडळींच्या मदतीने मंदारने हा अवघड सीन पार पडला आहे.