Coronavirus | अभिनेत्री आयशा टाकियाच्या पतीने 3 स्टार हॉटेल क्वॉरन्टाईन सेंटरसाठी दिलं!
फरहान आझमी समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा मुलगा आहे. अबू आझमी यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलवरून ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफरहान आझमी यांनी पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, 'गल्फ हॉटेलला एक स्टँडिंग ओवेशन मिळवण्याचा हक्क आहे. कारण हे नेहमी संकटकाळात कामी येतं. 1993 दरम्यान झालेल्या दंगलीत धारावी, प्रतिक्षा नगर आणि इतर क्षेत्रातील लोक येथे थांबले होते. तर आज कोरोनाच्या संकटातही गोल्फ हॉटेल गरजुंच्या कामी येत आहे.'
फरहान आझमी यांनी 2009मध्ये बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकियासोबत लग्न केलं होतं. दोघांना एक मुलगाही आहे.
दरम्यान, फरहान आझमी यांनी पहिल्यांदाच मदत केलेली नाही. याआधीही फरहान आझमी यांनी रफीक नगरमधील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तू पुरवल्या होत्या.
फरहान आझमी यांच्या या निर्णयामुळे त्यांचं कौतुक करण्यात येत आहे.
फरहान आझमी यांचं हे हॉटेल साऊथ मुंबईमध्ये आहे. फरहानने याबातची माहिती इन्स्टाग्राम पोस्ट करत दिली आहे.
फरहान आझमीने बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन (BMC)ला आपलं गल्फ हॉटेल क्वॉरंटाईन सेंटरच्या स्वरूपात वापर करण्यासाठी दिलं आहे. त्यामुळे त्यांचं हे हॉटेल आता क्वॉरंटाईन सेंटर म्हणून वापरण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकियाचे पती फरहान आझमीने कोरोनाविरूद्धच्या लढ्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वच सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -