PHOTO : लग्नासाठी धर्म बदलल्याने अभिनेत्री दीपिका कक्कर नेहमीच राहिली चर्चेत!
‘ससुराल सिमर का’ (Sasural Simar Ka) या लोकप्रिय टीव्ही मालिकेतून घरांघरात आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री दीपिका कक्कर (Dipika Kakkar) आज (6 ऑगस्ट) तिचा 36वा वाढदिवस साजरा करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदीपिका कक्करने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. पण, व्यावसायिक आयुष्यापेक्षा दीपिका अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. दीपिका अनेकदा सोशल मीडियावर पती शोएब इब्राहिमसोबतचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते, जे व्हायरल होतात.
टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री दीपिका कक्कर लग्नासाठी धर्म बदलल्यामुळे प्रचंड चर्चेत आली होती. या वेळी तिच्यावर जोरदार टीका देखील झाली होती. मात्र, कुण्याच्याही टीकेकडे लक्ष न देता दीपिकाने आपल्या प्रेमाची साथ दिली.
2015मध्ये दीपिकाने पहिल्या पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. अशा कठीण प्रसंगात दीपिकाला साथ दिली ती तिच्या ऑनस्क्रीन पतीने अर्थात अभिनेता शोएब इब्राहिम याने.
शोएब या मालिकेत दीपिकाच्या पतीची भूमिका साकारत होता. या शोदरम्यान दोघेही चांगले मित्र बनले होते. शोएबने दीपिकाला वाईट काळात साथ दिली. दरम्यान दोघांमध्ये प्रेम फुलू लागले.
बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका आणि शोएबने 2018मध्ये मुस्लिम रितीरिवाजांनुसार लग्न केले. लग्न करण्यासाठी दीपिकाने इस्लाम धर्म स्वीकारला होता. यावेळी तिने तिचे नाव बदलून फैजा केले. मात्र, आजही सगळे तिला दीपिका या नावानेच ओळखतात.