PHOTO : ‘माळी टाईम्स’, अभिनेत्री प्राजक्ता माळीची हटके साडी पाहिलीत का?
मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोंची चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच रंगल्याचं पाहायला मिळतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ असो वा कोणताही चित्रपट, प्राजक्ताचा साडी लूक नेहमीच चाहत्यांना घायाळ करतो.
सध्या प्राजक्ता माळी दररोज तिचे साडीतील नवीन फोटोशूट शेअर करत असते. तिचे हे साडीतील सुंदर फोटो चाहत्यांना प्रचंड आवडतात.
नुकतेच प्राजक्ता माळी हिने एका हटके साडीत फोटोशूट केले आहे. प्राजक्ता माळीने परिधान केलेल्या साडीवर पेपर प्रिंट आहे.
प्राजक्ताची ही साडी पाहून असे वाटते की, तिने जणू काही न्यूज पेपरची साडी तयार केली आहे.
या फोटोंना तिने ‘माळी टाईम्स’ असे हटके कॅप्शन दिले आहे. प्राजक्ताच्या या फोटोंवर सध्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. (PHOTO : @Prajakta Mali/IG)