Photo : सुरेखा कुडची घरातून आऊट, पाहूया त्यांचा आतापर्यंतचा प्रवास..

गेल्या आठवड्यात मराठी अभिनेता अक्षय वाघमारे 'बिग बॉस मराठी ३' मधून बाहेर पडल्यानंतर घरातून बाहेर पडणारा दुसरा स्पर्धक ठरल्या त्या अभिनेत्री सुरेखा कुडची. (Photo : @surekha.kudachi/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताना त्या खूपच भावुक झाल्या होत्या. (Photo : @surekha.kudachi/IG)

अभिनेत्री सुरेखा कुडची या अभिनयाच्या क्षेत्रात अनेक वर्षांपासूनकार्यरत आहेत. हिंदी , मराठी सिनेमासोबतच त्यांनी मालिकांतही काम करत लोकप्रियता मिळवलीये.. (Photo : @surekha.kudachi/IG)
पोलिसाची बायको, भरत आला परत, खुर्ची सम्राट, तीन बायका फजिती ऐका, फॉरेनची पाटलीण हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट (Photo : @surekha.kudachi/IG)
याशिवाय स्वाभिमान, देवयानी, रुंजी, नवरी मिळे नव-याला, चंद्र आहे साक्षीला यासारख्या मालिकांतही त्यांनी अभिनय केलाय (Photo : @surekha.kudachi/IG)
सुरेखा कुडची बाहेर पडणार म्हणल्यावर सर्व घर अगदी भावुक झालेलं.. (Photo : @surekha.kudachi/IG)
घरातून बाहेर पडताना त्या म्हणाल्या 'बिग बॉसच्या घरात एक वेगळीच जादू आहे, (Photo : @surekha.kudachi/IG)