दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीच्या एका वक्तव्यावरून देशभरात वादळ; काय आहे प्रकरण?
दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीच्या (Sai Pallavi) एका वक्तव्यावरून देशभरात वादळ उठले आहे.(photo:saipallavi.senthamarai/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हिंसा आणि धर्माच्या मुद्द्यावर बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट ‘कश्मीर फाइल्स’चा संदर्भ देताना अभिनेत्री म्हणाली की, ‘या चित्रपटात काश्मिरी पंडितांची त्यावेळी हत्या कशी झाली, हे दाखवण्यात आले आहे. पण, त्यापलीकडे जाऊन हिंसेला धर्माशी जोडले, तर काही दिवसांपूर्वी गायींनी भरलेला ट्रक घेऊन जाणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीलाही बेदम मारहाण करून जय श्री रामचा नारा देण्यास सांगितले. या दोन घटनांमध्ये काय फरक आहे?’(photo:saipallavi.senthamarai/ig)
अभिनेत्री साई पल्लवी सध्या तिच्या आगामी 'विराट पर्वम' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (photo:saipallavi.senthamarai/ig)
नुकतेच या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्रीने काश्मिरी पंडितांबद्दल असे काही वक्तव्य केले की, त्यावरून वाद सुरू झाला आहे. साई पल्लवीने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटातील काश्मिरी पंडितांवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रसंगांची तुलना मॉब लिंचिंगशी केली आहे.(photo:saipallavi.senthamarai/ig)
एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना साई पल्लवी म्हणाली की, ‘मी तटस्थ वातावरणात वाढले आहे. मी लेफ्ट विंग आणि राइट विंग बद्दल खूप ऐकले आहे, पण कोण बरोबर आणि कोण चूक, हे मी सांगू शकत नाही. काश्मिरी पंडितांची हत्या कशी होते, हे 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. पण, काही काळापूर्वी गाय घेऊन जाणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीला बेदम मारहाण करून जय श्री रामचा नारा लावण्यास सांगितले गेले, ही देखील धर्माच्या नावावर हिंसा आहे. आता या दोन घटनांमध्ये फरक काय?’(photo:saipallavi.senthamarai/ig)
सई म्हणाली की, मी तटस्थ राहून नेहमी पीडितांची साथ देण्याचा प्रयत्न करते. फक्त दोन सारख्या लोकांमध्येच भांडण होऊ शकते, दोन भिन्न लोकांमध्ये नाही, असे मला वाटते. अभिनेत्री म्हणाली की, तिच्या कुटुंबाने तिला नेहमीच चांगली व्यक्ती बनायला शिकवले आहे. तिला न्यायात उजवा किंवा डावा असा फरक दिसत नाही. तो म्हणते, जर तुम्ही माझ्यापेक्षा बलवान आहात आणि मला दडपत असाल, तर तुम्ही चुकीचे करत आहात. मोठा वर्ग समाजातील छोट्या वर्गाला दडपत असेल, तर ते चुकीचे आहे. स्पर्धा दोन समान लोकांमध्ये असावी. (photo:saipallavi.senthamarai/ig)