In Pics : कॅन्सरवर मात करुन 4 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर सोनाली बेंद्रेचं जोरदार कमबॅक!
Sonali Bendre : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) कॅन्सर या आजाराचा सामना करत होती. आता सोनालीनं कॅन्सरवर मात करुन छोट्या पडद्यावर जोरदार कमबॅक केलं. (photo: iamsonalibendre/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडिआयडी लिटिल मास्टर्स या रियालिटी शोजमध्ये सोनाली परीक्षकाच्या भूमिकेत दिसेल. या शोच्या निमित्ताने सोनाली पहिल्यांदाच डान्सिंग शोचं परीक्षण करणार आहे. (photo: iamsonalibendre/ig)
सोनालीनं सांगितलं, 'कॅन्सरनं माझं आयुष्य बदललं, हा डिआयडीचा पाचवा सिझन आहे. मी डान्स शोचे परीक्षण कधीच केले नव्हतं. लहान मुलांसोबत शोमध्ये सहभागी व्हायल मजा वाटते. मी ड्रामेबाज हा कार्यक्रम आर्धवट सोडला होता. आता पुन्हा कमबॅक करून मला आनंद होत आहे. मी एक्सायटेड आहे. माझ्या फॅमिली आणि मैत्र-मैत्रिणींनी मला सपोर्ट केला. पैसा आणि प्रसिद्धी ही येते आणि जाते पण प्रेम कायम राहते.' (photo: iamsonalibendre/ig)
मिशन सपने, इंडियाज गॉट टॅलेंट आणि इंडियाज बेस्ट ड्रामे बाज या छोट्या पडद्यावरील शोमधून सोनाली प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. (photo: iamsonalibendre/ig)
हम साथ साथ है, चल मेरे भाई आणि लज्जा या चित्रपटतील सोनालीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. (photo: iamsonalibendre/ig)
4 जुलै 2018 रोजी सोनालीनं सोशल मीडियावर तिला कॅन्सर झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. (photo: iamsonalibendre/ig)
सोनाली ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. (photo: iamsonalibendre/ig)
वेगवेगळ्या पोस्ट तसेच तिचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. (photo: iamsonalibendre/ig)
हा फोटो शेअर करत तिने लिहलंय '#DIDLilMasters चा पहिला दिवस 4 वर्षांनंतर रंगमंचावर परत येण्यासाठी खूप उत्साही! #कृतज्ञ ♥️' (photo: iamsonalibendre/ig)