PHOTO : जणू स्वर्गातून उतरली अप्सरा... सोनाली कुलकर्णीचा ‘भरतनाट्यम’ लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा!
मराठी मनोरंजनातील आघाडीची अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. अभिनेत्री सध्या प्रचंड चर्चेत आहे. नुकतेच तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपले क्लासी आणि हटके फोटो ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकतेच सोनालीने इंस्टाग्रामवर नवे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती भरतनाट्यम करताना दिसत आहे. तिचे हे फोटो ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटातील आहेत.
जांभळ्या रंगाची साडी आणि दागिने, सोनालीचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री नृत्यांगना म्हणून जरी सिनेसृष्टीत आली असली तरी हळूहळू तिने तिची इमेज बदलून वेगवेगळ्या विषयांवर बेतलेले चित्रपट केले.
अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
सोनाली कुलकर्णी मराठीमधली एक उत्कृष्ट नायिका म्हणून नावारुपाला आली आहे. (Photo : @sonalee18588/IG)