नोराने सिनेइंडस्ट्रीबद्दल सांगितल्या काही धक्कादायक गोष्टी; म्हणाली..
आपल्या दिलखेच अदा, नृत्य आणि सौंदर्याने नोरा फतेहीने (Nora Fatehi) बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिचा आता एक चाहता वर्गदेखील तयार झाला आहे. नोराने सिनेइंडस्ट्रीबद्दल काही धक्कादायक गोष्टी उघड केल्या आहेत. तिने बॉलिवूडमधील (Bollywood) कपल्सवर निशाणा साधला आहे.
अलीकडेच नोराने रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना तिने बॉलिवूड कपल्सवर निशाणा साधला आहे. नोराने सांगितले की, 'मी माझ्या आधी अशी अनेक जोडपी पाहिली आहेत ज्यांनी केवळ पैशासाठी लग्न केले.
ते त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी लग्न करतात. पैसा, प्रसिद्धी, सत्ता, नेटवर्किंग अशा गोष्टींसाठी ते पती किंवा पत्नीचा वापर करतात. यासारखी दुसरी कोणती वाईट गोष्ट काय असू शकते असेही तिने विचारले.
नोरा फतेहीने पुढे सांगितले की, जर कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत असेल तर काहीजण विचार करतात की या अभिनेत्यासोबत, अभिनेत्रीसोबत विवाह केला तर माझ्या करिअरचा ग्राफही चांगला भरारी घेईल. सिनेइंडस्ट्रीमध्ये लोक खूपच हिशोबी असतात.
अशी लोक पैशांसाठी आपलं सगळं आयुष्य उद्धवस्त करतात. तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत प्रेम करत नाही आणि त्याच्यासोबत तुम्ही लग्न करता, यापेक्षा काय वाईट असू शकते असेही नोराने म्हटले.
फक्त प्रसिद्धी आणि एका मोठ्या नेटवर्कचा हिस्सा होण्यासाठी ही लोक असे वागतात. आमच्या इंडस्ट्रीमध्ये अशी अनेक लोक असल्याचा दावा तिने केला.
नोराने पॉडकास्ट मध्ये पुढे म्हटले की, आपल्या करिअरची चिंता प्रत्येकाला असते, हे मी समजू शकते.
पण, याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचं आयुष्य उद्धवस्त करावे. या कारणांमुळे ही लोक नंतर डिप्रेशनमध्ये जातात आणि विचार करतात की अखेर हे डिप्रेशन का आहे? स्वार्थापोटी हे सगळे होत आहे, हे लक्षात येत नाही असेही नोराने म्हटले. (photoLnorafatehi/ig)