Shah Rukh Khan Birthday : किंग खान शाहरूखच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांची क्रेझ कायम; पाहा फोटो
बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा आज त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करतोय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशाहरूखच्या वाढदिवसानिमित्त मध्यरात्रीपासून 'मन्नत' बंगल्याबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली.
बर्थडे बॉय शाहरुख खानची क्रेझ एवढी आहे की, खासकरून शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी बंगळुरूमधील 150 जणांचा ग्रुप मुंबईतील 'मन्नत'मधून बाहेर पडला आहे.
दक्षिण भारतातील या सर्व चाहत्यांमध्ये मुले, मुली आणि लहान मुलांचाही समावेश आहे.
विशेष बाब म्हणजे या सर्व चाहत्यांनी एकाच रंगाचे म्हणजे पिवळे टी-शर्ट आणि काळ्या रंगाच्या टोप्या परिधान केल्या आहेत.
प्रत्येकाच्या टी-शर्टवर 'हॅपी बर्थडे शाहरुख खान' असे लिहिलेले आहे.
शाहरुखची एक झलक पाहणारे हे चाहते हातात बॅनर आणि पोस्टर घेऊन शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी जमले आहेत.
या ठिकाणी आपल्याला मोठमोठे पोस्टर्स देखील पाहायला मिळतायत.