In Pics : कसा आहे सैफ आणि अभिनेत्री करिना कपूर यांचा पतौडी पॅलेस? जाणून घेऊयात सैफच्या पतौडी पॅलेसबद्दल 'या' खास गोष्टी
Saif ali khan Pataudi Palace : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानला (saif ali khan) पतौडीचा नवाब म्हणले जाते. सैफ आणि अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) यांच्या पतौडी पॅलेसची चर्चा नेहमी होत असते. या पॅलेसमध्ये काय काय आहे? या पॅलेसची किंमत काय? असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडतात. जाणून घेऊयात सैफच्या पतौडी पॅलेसबद्दल काही खास गोष्टी-
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसैफचा पतौडी पॅलेस हा हरियाणामध्ये आहे.एका रिपोर्टनुसार पतौडी पॅलेसमध्ये 150 खोल्या आहेत. तसेच 100 नोकर या पॅलेसमध्ये काम करतात.
पतौडी पॅलेसमध्ये वीर-जारा, मेरे ब्रदर की दुल्हन आणि मंगल पांडे या सुपर हिट चित्रपटांचे चित्रीकरण या पॅलेसमध्ये झाले आहे. तांडव या वेब सीरिजचे देखील शूटिंग या पॅलेसमध्ये झाले आहे.
पतौडी पॅलेस हा डिझाइन रॉबर्ट टोर रसेल यांनी डिझाइन केला आहे. रॉबर्ट टोर रसेल यांनी दिल्लीमधील कनॉट प्लेस देखील डिझाइन केले होते.
हा पॅलेस इब्राहिम कोठी म्हणून देखील ओळखला जातो. पतौडी पॅलेसची किंमत 800 कोटींपेक्षा जास्त आहे.
करीना आणि सैफ त्यांच्या कुटुंबासोबत अनेक समारंभ पतौडी पॅलेसमध्ये साजरे करतात.
सैफ आणि अभिनेत्री करिना कपूर हे 'टशन' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले. सैफने करिनासोबत 2012 मध्ये लग्न केले.