एक हसला तर दुसरा निवांत लेटून, यंदा पुणेकरांना वेगवेगळ्य़ा मुडमधील बालगणेशांची भुरळ

गणेशोत्सव म्हटलं की, गणपतीच्या वेगवेगळ्या मूर्ती बघायला मिळतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आपल्या घरातील मूर्ती सगळ्यात सुंदर आणि आकर्षक असावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते.

त्यामुळे अनेक भाविक घरगुती गणपतीसाठी वेगवेगळे पर्याय आणि आकर्षक मूर्ती शोधत असतात.
त्यात पर्यावरणपुरक मूर्ती, वेगवेगळ्या प्रकारचे फेटे घालून असलेले गणपती तर कधी इको फ्रेंडली गणपतीच्या शोधात असतात मात्र यंदा बालगणेश मूर्तीला चांगलीच पसंती मिळत आहे.
यात आपल्या लाडक्या बाप्पांचं लहान रूप पाहायला मिळणं म्हणजे भाविंकांसाठी पर्वणीचं..
कुठे हसरा तर कुठे निवांत बसलेले बाप्पा सध्या बाजारात पाहायला मिळत आहेत.
बाळगणेशाचं हे रूप पाहून कोणीही त्याची दखल घेतल्याशिवाय राहू शकत नाही.
खेळणारे बाप्पा, पुस्तक वाचणारे बाप्पा त्यासोबतच लाडू खाणारे बाप्पा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.
गणरायाच्या आगमनासाठी एकच दिवस बाकी असल्याने आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठीच्या तयारीची लगबग आणखी वाढली आहे.
गणरायाच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू नये यासाठी गणेशभक्त जय्यत तयारी करत आहे.