'या' भारतीय सिताऱ्यांना ब्रिटनच्या महाराणी Queen Elizabeth यांना भेटायचं मिळालं भाग्य
बॉलिवूडचे अनेक सिताऱ्यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांना भेटण्याचं भाग्य मिळालं. 2017 साली बकिंगहॅम पॅलेसमध्ये 'यूके-इंडिया इयर ऑफ कल्चर' चे आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमात अनेक भारतीयांनी भाग घेतला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूड स्टार कमल हसन यांनी या कार्यक्रमात भाग घेऊन ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांची भेट घेतली होती.
बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांनाही ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांना भेटायची संधी मिळाली.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी आपल्या पत्नीसोबत या कार्यक्रमात भाग घेतला होता.
2017 साली भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांची भेट घेतली होती.
फिल्म 'हाऊसफुल्ल 4' च्या शूटिंगच्या दरम्यान अभिनेत्री पूजा हेगडेने ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ आणि रॉयल फॅमेलीची भेट घेतली होती. तिने आपले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.
फिल्ममेकर आणि कोरियोग्राफर फराह खान हिने 'हाऊसफुल्ल 4' च्या शूटिंग दरम्यान महाराणी एलिझाबेथची भेट घेतली होती आणि त्याचा फोटो शेअर केला होता.