PHOTO : प्रियांका चोप्रा गोल्फच्या मैदानात, सिझलिंग फोटोंवर निक जोनासाची खास कमेंट!
प्रियांका चोप्राने गोल्फ खेळतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा पांढऱ्या आणि राखाडी रंगाच्या क्रॉप टॉप आणि फिट स्कर्टमध्ये दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्रीसोबत तिचा पती निक जोनासही (Nick Jonas) मित्रांसोबत गोल्फ खेळण्यासाठी आला होता. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
प्रियांका चोप्राने गोल्फ मैदानातील फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती काळ्या सनग्लासेस घालून केस बांधताना दिसत आहे. प्रियांकाचे हे फोटो पाहून पती निक जोनासही घायाळ झाला आहे.
या फोटोंवर कमेंट करताना निक जोनासने लिहिले की, ‘तू इतकी हॉट का आहेस?’ फोटो शेअर करताना प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आजचा दिवस चांगला होता.’
मुलीच्या जन्मानंतर प्रियांकाने काही काळ सोशल मीडियावरून ब्रेक घेतला होता. मात्र, आता ती पुन्हा एकदा चाहत्यांचे मनोरंजन करायला आणि आपल्या अपडेट्स द्यायला सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे.
सध्या प्रियांका आणि निक जोनास दोघेही सोशल मीडियावर भरपूर पोस्ट करत आहेत. (Photo : Priyanka Chopra/IG)