Myra Vaikul : नऊवारी साडी, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, डोक्याला फेटा; चिमुकल्या मायराचं शिवजयंतीनिमित्त खास फोटोशूट
शिवजयंतीनिमित्त 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परी अर्थात मायरा वैकुळने खास फोटोशूट केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनऊवारी साडी, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, डोक्याला फेटा असा साज मायराने केला आहे.
शिवजयंती स्पेशल फोटोशूट मायराने खास शिवनेरी किल्ल्यावर केलं आहे.
मराठमोळ्या रुबाबातील मायराचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
'जय भवानी जय शिवाजी', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', अशा घोषणा देत मायराने फोटो शेअर केले आहेत.
मायराने फोटो शेअर करत लिहिलं आहे, कपाळी चंद्रकोर, नथ शोभते नाकी, गळी शोभते नाजूकशी सर आणि ठुशी नाकी डोळी नीटस जणून रेखीव घडवली मूर्ती...नऊवारी साडीतच दिसते ठसकेदार अस्सल मराठी मुलगी.
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून मायरा वैकुळ घराघरांत पोहोचली आहे.
मायराचा पारंपरिक लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
मायराने फोटो शेअर करण्यासोबत रील देखील बनवलं आहे.
मायराच्या फोटोवर जय शिवराय, जय भवानी जय शिवाजी, मराठी मुलगी, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.