PHOTO: सी-थ्रू ड्रेसमुळे प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर पुन्हा ट्रोल!

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.(photo:malaikaarora_lover/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मलायका ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो तसेच डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. अनेक वेळा मलायकाला नेटकरी तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे ट्रोल करतात. (photo:malaikaarora_lover/ig)

नुकतीच मलायकानं मिस इंडिया 2022 या इंव्हेंटला हजेरी लावली. या इव्हेंटसाठी मलायकानं खास लूक केला होता. मलायकानं या इव्हेंटच्या रेड कार्पेटवर वॉक देखील केला.(photo:malaikaarora_lover/ig)
मलायकानं मिस इंडिया 2022 या इंव्हेंटसाठी केलेल्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. काही नेटकरी हे सध्या मलायकाच्या या लूकला ट्रोल करत आहेत. (photo:malaikaarora_lover/ig)
मलायकानं डोल्डन कलरचा ड्रेस आणि गळ्यात स्टोनचा नेकलेस असा लूक केला होता. या लूकमधील मलायकाच्या नेकलेसनं अनेकांचे लक्ष वेधले. हा नेकलेस सलमान खानच्या हातातील नेकलेससारखा दिसत आहे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'हा सलमान खानचे ब्रेसलेट मलायकानं गळ्यात का घातलंय? (photo:malaikaarora_lover/ig)
मलायकानं मिस इंडिया 2022 इव्हेंटसाठी गोल्डन कलरचा सी-थ्रू ड्रेस घातला होता. या ड्रेसमुळे देखील मलायकाला ट्रोल केलं जात आहे. (photo:malaikaarora_lover/ig)
48 वय असणारी अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. मलायका अनेकांना नियमित योगा करण्याचा सल्ला देते. मलायका वर्क-आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या सोशल मीडियावर पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. (photo:malaikaarora_lover/ig)