आर्चीला खऱ्या आयुष्यातला परशा भेटला? Viral फोटोमुळे लग्नाच्या चर्चांना उधाण, रिंकूसोबत दिसलेला 'तो' कोण?

Krishna Mahadik Meet Rinku Rajguru: सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या चर्चेत आहे, ती भाजप खासदाराच्या लेकासोबत व्हायरल झालेल्या फोटोमुळे.

Krishna Mahadik Meet Rinku Rajguru

1/11
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये रिंकूसोबत भाजप खासदाराचा लेक आहे. तसेच, कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदीर परिसरातील आहे.
2/11
हा फोटो व्हायरल झाल्यापासून रिंकू आणि भाजप खासदाराच्या लेकाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
3/11
रिंकूसोबत फोटोत दिसत असलेली व्यक्ती म्हणजे, भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक आहेत.
4/11
युट्यूबर, समाजसेवक आणि उद्योजक म्हणून कृष्णराज महाडिक यांना ओळखलं जातं. तसेच, वडील राज्यसभेचे खासदार असल्यामुळे कृष्णराज महाडिक यांचाही राजकीय वर्तुळात वावर असतो.
5/11
कृष्णराज महाडिक यांनी स्वतःच्या सोशल मीडिया हँडलवरुन रिंकू राजगुरूसोबतचा फोटो शेअर केला होता. तसेच, या फोटोसोबत कॅप्शनही देण्यात आलं आहे.
6/11
"आज अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूर येथे आल्या आणि त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले.", असं कॅप्शन कृष्णराज महाडिक यांनी फोटो शेअर करताना दिलं आहे.
7/11
कृष्णराज महाडिक यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन शेअर केलेला फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
8/11
दोघांचा हा फोटो काही मिनिटांतच व्हायरल झाला असून त्यावर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करण्यात आला.
9/11
कृष्णराज महाडिक आणि रिंकू राजगुरूचा एकत्र फोटो पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. चाहत्यांनी कमेंट करुन दोघांचं अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे.
10/11
तर, रिंकू राजगुरूसोबत लग्न ठरलंय का? असा थेट प्रश्नही काही चाहत्यांनी कृष्णराज महाडिक यांना विचारला आहे.
11/11
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या आवारातच हा फोटो काढल्यानं दोघांचं ठरलं का? लग्न करण्याचा विचार आहे की काय? मग कधी आणि कसं जुळलं? असे प्रश्न चाहते कमेंट करून विचारत आहेत.
Sponsored Links by Taboola