Kamya Punjabi : काम्या एका पाणीपुरी स्टॉलवर एक लाख रुपये विसरली होती; जाणून घेऊयात या घटनेबाबत...
Kamya Punjabi : पैसे किंवा सोन्याचे दागिने हे निट सांभाळून ठेवणं गरजेचे असते. चोरी केलेले पैसे किंवा हरवलेले सोन्याचे दागिने हे अनेक वेळा परत मिळत नाहीत. पण अभिनेत्री काम्या पंजाबीला (Kamya Punjabi) मात्र तिचे विसरलेले पैसे परत मिळाले आहेत.(फोटो:panjabikamya/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाम्या ही एका पाणीपुरी स्टॉलवर एक लाख रुपये विसरली होती. पण हे पैसे तिला पुन्हा सापडले. जाणून घेऊयात या घटनेबाबत...(फोटो:panjabikamya/ig)
एका मुलाखतीमध्ये काम्यानं तिच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत सांगितलं, 'रविवारी (29 मे) मी एका कार्यक्रमासाठी इंदूर येथे गेले होते. या कार्यक्रमामधून परत येत असताना माझ्या मॅनेजरनं मला छप्पन या दुकानाबद्दल सांगितलं. या दुकानामध्ये खूप टेस्टी पाणीपुरी मिळते असंही तो म्हणाला. इंदुरमध्ये पाणीपुरी खूप टेस्टी मिळते. त्यामुळे मला देखील ते ट्राय करायचं होतं. माझ्या जवळ तेव्हा एका पाकिटामध्ये एक लाख रुपये होते. मी त्या दुकानामध्ये पाणीपुरी खात असताना मी ते पाकिट टेबलावर ठेवले होते. त्यानंतर फोटो काढण्यात आणि खाण्यात मी मग्न झाले. त्यामुळे मी ते पाकिट त्या टेबलवरच विसरले. '(फोटो:panjabikamya/ig)
पुढे काम्यानं सांगितलं, 'जेव्हा मला लक्षात आलं की पैशांचे पाकिट मी दुकानातच विसरले आहे, तेव्हा मला खूप भिती वाटली. माझा मॅनेजर लगेच त्या दुकानामध्ये गेला. ते पाकिट सापडावे, यासाठी मी प्रार्थना करत होते. माझा मॅनेजर त्या पाणीपुरी स्टॉलचे मालक असणाऱ्या दिनेश गुर्जर यांच्यासोबत बोलत होता. तो पाकिट घेऊन परत आला. ते पाकिट सापडले आहे, या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. इंदूरचे लोक खूप चांगले आणि प्रेमळ आहेत '(फोटो:panjabikamya/ig)
शक्ती अस्तित्व के एहसास की या मालिकेमधील काम्याच्या अभिनाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.(फोटो:panjabikamya/ig)
अनेक मालिकांमधून काम्या प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. (फोटो:panjabikamya/ig)