पिवळा स्कर्ट आणि गुलाबी ब्लाऊजमध्ये गोविंदाची भाची नटली; पाहा हळदी समारंभातील फोटो!
आरती सिंगच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली असून अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री तिच्या लग्नाच्या प्रत्येक फंक्शनचा खूप आनंद घेत आहे.
हळदी समारंभात, आरतीने गुलाबी रंगाच्या चोलीसह पिवळ्या रंगाचा प्रीट स्कर्ट परिधान केला होता आणि तिच्या हाताभोवती एक लांब गजरा गुंडाळला होता.
हळदी समारंभात अभिनेत्री 'मेहंदी लगाके रखना' या गाण्यावर डान्स करताना दिसली.
तिचा भावी नवरा दीपक चौहान देखील या कार्यक्रमात दिसत आहे.
यावेळी दीपक लाल प्रिंटसह पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान करताना दिसला.
यावेळी आरतीचा भाऊ आणि वहिनी कश्मिरा शाह आणि कृष्णा अभिषेक वधूसोबत पोज देताना दिसले.
यावेळी कश्मिरा आणि कृष्णा खूप खुश दिसत होते.
हळदी समारंभाच्या फोटोंमध्ये जबरदस्त सजावट दिसत आहे. (all pc:artisingh5/ig)