Ganesh Chaturthi Celebration : बाप्पाला घेण्यासाठी Shilpa Shetty पोहोचली लालबागला, पाहा फोटो
शिल्पा शेट्टी दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करते. दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी बाप्पा आयुष्यातील विघ्न दूर करेल या आशेने शिल्पाने परंपरा कायम ठेवली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरवर्षी ती पती राज कुंद्रासोबत बाप्पाला घरी घेऊन येते. मात्र यावेळी ती एकटीच बाप्पाला आणण्यासाठी शिल्पा लालबागला पोहचली आहे.
शिल्पा शेट्टी लालबागच्या राजाची भक्त आहे. त्यामुळे दरवर्षी ती आपल्या घरी लालबागच्या राजाची इकोफ्रेंडली शाडूच्या मातीची प्रतिकृती मूर्तीची स्थापना करते
शिल्पा बाप्पाला घेण्यासाठी आली त्यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क लावले होते. या वेळी पापासाझीच्या विनंतीवर शिल्पाने हसत काही फोटो देखील काढले.
बाप्पाला घेण्यासाठी आलेल्या शिल्पाच्या चेहऱ्यावर आनंद होता.
शिल्पा सध्या अत्यंत कठिण काळात असून पती राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात गेल्या दीड महिन्यांपासून जेलमध्ये आहे.
परंतु या कठीण काळात देखील शिल्पा मोठ्या हिंमतीने सामना करत आहे. शिल्पाने सुपर डान्सर चॅप्टर 4 चे शुटिंग देखील पुन्हा सूरू केले आहे.