In Pics | नोरा फतेही ते आयुष्मान खुरानापर्यंत 'या' बॉलीवूड स्टार्सचं रिअॅलिटी शो मुळे नशीब चमकलं
विविध चॅनल्सवर सध्या रिअॅलिटी शोजचं एकच पेव फुटलंय. परदेशांतल्या प्रसिद्ध रिअॅलिटी शोजची भारतीय व्हर्जन्स आपल्याकडे पाहायला मिळतायंत. या शोजमधले स्पर्धक, जजेस, त्यांची लोकप्रियता याची नेहमीच जोरदार चर्चा होत असते. तर रिअॅलिची शो मुळे अनेक आज बॉलीवूडमध्ये यशस्वी झाले आहे. आज आपण त्यांच्याविषयी जाणून घेणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनोरा फतेही : डान्सर ते बॉलीवूड अभिनेत्री असा नोराचा थक्क करणारा प्रवास आहे. पहिल्यांदा नोरा 2015 साली बिग बॉस 9 मध्ये दिसली त्यानंतर नोराला काम मिळण्यास सुरुवात झाली. नोराने अनेक बॉलीवूड आयटम नंबर केले त्यामुळे ती फेमस झाली. अलीकडे नोरा भुज : द प्राइड ऑफ इंडिया या चित्रपटात दिसली.
आयुष्मान खुराना : बॉलीवूड सर्वात टॅलेंन्टेड स्टार्सपैकी एक अशी आयुष्मान खुरानाची ओळख आहे. सर्वात पहिल्यांदा आयुष्मान एमटीवी रोडीज या शोमध्ये दिसला. शो जिंकल्यानंतर आयुष्मान बॉलीवूडकडे वळाला. आयुष्मान विकी डोनर या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली.
प्राची देसाई : प्राची देसाईने एकता कपूरच्या कसम या मालिकेतून पदार्पण केले. त्यानंतर तीला झलक दिखला जा या डान्स रिअॅलिटी शो ने ओळख दिली. त्यानंतर प्राची रॉक ऑन या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. त्यानंतर प्राची अनेक चित्रपटांमध्ये दिसली.
रणविजय सिंघा : रणविजय सिंघाचे नशीब एमटीवी रोडीज या रिअॅलिटी शोमुळे पालटले. शो जिंकल्यानंतर रणविजय अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिसला. रणविजयने अनेक शोमध्ये परीक्षक म्हणून हजेरी लावली. 2009 मधील चित्रपट टॉस : अ फ्लिप ऑफ डेस्टिनी या चित्रपटात दिसला.