अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याच्या गाजलेल्या चित्रपटांबद्दल!
Allu Arjun Birthday : अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा टॉलीवूड इंडस्ट्रीचा सुपरस्टार आहे. अभिनयासोबतच त्याच्या स्टाईलचे लाखो चाहत्यांना वेड लावले आहे. आज म्हणजेच 8 एप्रिल 2022 रोजी अल्लू अर्जुन त्याचा 40वा वाढदिवस साजरा करत आहे.(photo:alluarjunonline/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त, त्याच्या गाजलेल्या चित्रपटांबद्दल जाणून घेऊ, ज्यांनी अल्लू अर्जुनला खूप प्रसिद्धी मिळवून दिली.(photo:alluarjunonline/ig)
अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘रेस गुर्रम’ हा एक अॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका सामान्य मुलाची कथा आहे, ज्याचे आयुष्य अचानक बदलून जाते, जेव्हा एक धोकादायक गुन्हेगार शिव रेड्डी त्याच्या आयुष्यात येतो. प्रेक्षक हा चित्रपट यूट्यूबवर पाहू शकतात.(photo:alluarjunonline/ig)
सराईनोडू : 2016मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अल्लू अर्जुनने एका माजी सैनिकाची भूमिका केली होती, जो भ्रष्टाचारी आणि अन्याय करणाऱ्यांना शिक्षा करतो. चित्रपटातील अभिनेत्याच्या दमदार अॅक्शनसोबतच, त्याची रोमँटिक शैलीही प्रेक्षकांना पाहायला मिळाली. चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने जगभरात 127 कोटींचा व्यवसाय केला. प्रेक्षक हा चित्रपट जिओ सिनेमावर पाहू शकतात.(photo:alluarjunonline/ig)
वैकुंठपुरमलो : 2020मध्ये आलेला आलेला ‘वैकुंठपुरमलो’ हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात अभिनेत्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडेही झळकली होती. चित्रपटातील अल्लूच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलायचे, तर अभिनेता यात बंटू नावाच्या एका व्यक्तीची भूमिका करतोय, जो त्याच्या वडिलांना शोधण्यासाठी निघतो आणि नंतर त्याच्या कुटुंबाला त्रास देणाऱ्या माणसापासून वाचवतो.(photo:alluarjunonline/ig)
डीजे (दुव्वाद जगन्नाथ) : अभिनेता अल्लू अर्जुनचा आणखी एक चांगला चित्रपट म्हणजे ‘डीजे’ (दुव्वाद जगन्नाथ). हा चित्रपट 2017मध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाची कथा एका व्यक्तीभोवती फिरते, जो लग्न आणि समारंभासाठी स्वयंपाकी म्हणून काम करतो. पण, आपल्या रागीट शैलीने तो अनेक गुन्हेगारांना त्यांच्या कृत्याची शिक्षाही देतो. विशेष म्हणजे गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे काम तो घरातील सदस्यांपासून लपून करतो.(photo:alluarjunonline/ig)
पुष्पा : द राईज : या चित्रपटातील अभिनेत्याच्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. या चित्रपटातील अल्लू अर्जुनची व्यक्तिरेखा त्याने आजवर साकारलेल्या सर्व पात्रांपेक्षा खूपच वेगळी होती. ‘पुष्पा’मध्ये अल्लू अर्जुनचा एका मजुरापासून ते तस्करी किंग बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवला होता. या चित्रपटातील अभिनेत्याची रफ अँड टफ भूमिका लोकांना खूप आवडली.(photo:alluarjunonline/ig)