मेकअपशिवाय देखील या अभिनेत्री आहेत सौंदर्याच्या खाण; घरीच घेतात त्वचेची काळजी
Priyanka Chopra प्रियंका आपल्या ओठांना एक्सफोलिएट करण्यासाठी होममेड लिप स्क्रबचा वापर करते आणि घरच्या घरीच ओठांना चमकदार बनवते. तिच्या कोरड्या ओठांची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे, ज्यासाठी ती समुद्रातील मीठापासून ओठांचे स्क्रब करते. हे स्क्रब तयार करण्यासाठी, 2 चमचे समुद्राचे मीठ, 1 चमचा शुद्ध वेजिटेबल ग्लिसरीन आणि 1 चमचा गुलाब पाणी मिसळा. ते आपल्या बोटावर घेऊन ओठांवर मालिश करा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAnanya Panday- बावीस वर्षीय अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या आईने दिलेली फेस मास्क रेसिपी वापरते, जी तिच्या त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करते. हे तयार करण्यासाठी एक चमचा दह्यात 1 चमचा हळद आणि 1 चमचा मध मिसळा. नंतर चेहऱ्यावर लावून 15 मिनिटांसाठी सुकू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुवा.
Malaika Arora- मलायकाला बॉडी स्क्रबची आवड आहे. आपली त्वचा जवान ठेवण्यासाठी ती बरेच बॉडी स्क्रब बनवते. यासाठी ती 1 चमचा कॉफी पावडर, 1 मोठा चमचा ब्राऊन शुगर आणि नारळ किंवा बदाम तेलाचे काही थेंब मिसळते. मऊ, कोमल आणि हायड्रेटेड त्वचेसाठी हे स्क्रब आपल्या संपूर्ण शरीरावर लावा.
Katrina Kaif बर्फाने भरलेल्या भांड्यात कतरिना नियमितपणे आपला चेहरा बुडवते. घरी क्रायो फेशियल ही एक लोकप्रिय स्किनकेयर पद्धत आहे, जी जगभरातील लोकांनी स्वीकारली आहे. आपण दररोज सकाळी 1 मिनिट आईस फेशियल करू शकता, ज्यामुळे डोळ्याभोवतीची सूज कमी होण्यास मदत होते. हे त्वचेच्या तेलकटपणापासून मुक्त होण्यास देखील मदत करते.
Janhvi Kapoor- जान्हवी कपूरसुद्धा तिच्या सौंदर्यासाठी चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ती वारंवार तिच्या चेहऱ्यावर फळांचा फेस पॅक लावते, जेणेकरून तिची त्वचा नेहमी चमकत राहते.