Untold Story : 8 लग्न, 13 वर्षे बॉक्स ऑफिस गाजवलं, सर्वाधिक मानधन, पण प्रेमात कमनशिबी, कोण आहे ही अभिनेत्री?
Elizabeth Taylor Life Story : अभिनेत्री एलिझाबेथ टेलर ही हॉलिवूड गाजवलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने 13 वर्ष बॉक्स ऑफिस गाजवलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहॉलिवूड अभिनेत्री एलिझाबेथ टेलर सहा दशक इंडस्ट्रीमध्ये सक्रिय होती, या काळात तिने अनेक हिट चित्रपट दिले. एक बाल कलाकार म्हणून सुरुवात केलेली ही अभिनेत्री पुढे जाऊन हॉलिवूडची टॉप अभिनेत्री बनली. 1940 च्या दशकात एलिझाबेथ टेलरने चाईल्ड आर्टिस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 1950 च्या दशकात तारुण्यात हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ठरली. 1960 मध्ये ती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती.
एलिझाबेथ टेलरने 1957 ते 1970 च्या काळात बॉक्स ऑफिसवर धमाका केला. हा काळ एलिझाबेथने चांगलाच गाजवला. ती त्या काळातील हॉलिवूडची सर्वात जास्त फी घेणारी अभिनेत्री होती.
एलिझाबेथचं वैयक्तिक आयुष्य कोणत्याही फिल्मी कहाणीप्रमाणेच रोमांचक आणि चढ-उतारांनी भरलेलं राहिलं आहे. एलिझाबेथने आयुष्यात 8 वेळा लग्न केलं होतं. अभिनेत्री एलिझाबेथ टेलरने आठ वेळा लग्नगाठ बांधली. त्यातही तिने एकाच व्यक्तीसोबत दोन वेळा लग्न केलं. तिच्या आयुष्याविषयी रंजक कहाणी जाणून घ्या.
अभिनेत्री एलिझाबेथ टेलरचं पहिलं लग्न कॉनराड निकी हिल्टन याच्यासोबत झालं, पण हे नातं फार काळ टिकलं नाही. लग्नानंतर लगेचच दोघांमध्ये खटके उडू लागले आणि त्यांच्या घटस्फोट झाला.
हिल्टनपासून वेगळं झाल्यानंतर एलिझाबेथने मायकल वाइल्डिंगशी दुसरे लग्न केलं. त्यांचे हे लग्न खूप चर्चेत होते कारण मायकेल तिच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठा होता. मग काही वर्षांनी दोघांमध्ये मतभेद निर्माण होऊ लागले आणि ते विभक्त झाले.
मायकल वाइल्डिंगपासून घटस्फोट घेतल्यानंतर, तिची भेट मायकल टॉडसोबत झाली. एलिझाबेथने मायकलसोबत तिसरं लग्न केलं. काही काळानंतर मायकेल टॉडचा मृत्यू झाला, त्यानंतर एलिझाबेथच्या आयुष्यात एडी फिशरने एन्ट्री घेतली.
फिशर आधीच विवाहित होता. तरीही, एलिझाबेथ आणि फिशर यांच्या प्रेमसंबंध निर्माण झाले आणि एलिझाबेथने एडी फिशरशी चौथं लग्न केलं. मग फिशरपासून घटस्फोट घेतल्यानंतर, हॉलिवूड अभिनेता एलिझाबेथ रिचर्ड बर्टनच्या प्रेमात पडली.
एलिझाबेथ आणि रिचर्ड बर्टन दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं आणि त्यांनी लग्न केले. हे एलिझाचे पाचवं लग्न होते. पण रिचर्ड बर्टनसोबतचे तिचे लग्नही फार काळ टिकले नाही आणि त्यांच्या नात्यात दुरावा आला. नंतर दोघांचा घटस्फोट झाला.
एलिझाबेथ आणि रिचर्ड यांच्यातील प्रेमाने त्यांना पुन्हा जवळ आणले आणि सुमारे दीड वर्षांनी 16 महिने वेगळ राहिल्यानंतर दोघांनी पुन्हा लग्न केले. एलिझाबेथचे हे सहावे लग्न होते. इतकं होऊनही त्यांचं नातं टिकू शकलं नाही.
यानंतर, एलिझाबेथने जॉन वॉर्नरशी सातवं लग्न केलं, पण परस्पर वादामुळे अखेर दोघेही वेगळे झाले. एलिझावेथने लॅरी फोर्टेन्स्कीशी आठवे लग्न केलं.