अमिताभ बच्चन दिवाळखोरीच्या वाटेवर असताना यश चोप्रांना केली होती विनंती, नंतर वर्षातच पालटलं आयुष्य
अमिताभ बच्चन यांना शतकातील महान नायक म्हटले जाते. बच्चन यांनी संपत्ती, प्रसिद्धी आणि सर्व काही आपल्या कष्टाच्या जीवावर साध्य केलं आहे. (Photo Credit - Social Media)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण त्यांच्या कारकिर्दीतही एक काळ होता. जेव्हा ते दिवाळखोरीच्या मार्गावर पोहोचले होते. एकामागून एक चित्रपट फ्लॉप होत होते. एबीसीएल नावाने सुरू केलेली कंपनीही चालली नाही. त्यामुळे घरची आर्थिक स्थिती पूर्णपणे कोलमडली. (Photo Credit - Social Media)
त्यावेळी परिस्थिती अशी बनली होती की अभिषेकला परदेशातील अभ्यास मध्यभागी सोडून परत बोलवण्यात आले. अभिषेकनेही चांगल्या मुलाचे कर्तव्य पार पाडले आणि शिक्षण सोडून वडिलांना प्रत्येक गोष्टीत मदत केली. (Photo Credit - Social Media)
जेव्हा सर्व बाजूंनी अडचणी वाढत गेल्या आणि कोणताही तोडगा निघाला नाही, तेव्हा अमिताभ बच्चन यांनी मोठा निर्णय घेतला. दिग्दर्शक यश चोप्रा यांना भेटून त्यांनी काम मागितलं. यश चोप्रानेही त्यांची निराशा केली नाही. (Photo Credit - Social Media)
त्यानंतर अमिताभ बच्चन यांना मोहब्बतें चित्रपटाची ऑफर देण्यात आली. ज्यामध्ये त्यांच्यासोबत शाहरुख खान आणि ऐश्वर्या रायशिवाय इतर अनेक स्टार होते. पण या चित्रपटातील बिग बींची भूमिका खूप महत्वाची होती. स्क्रिप्ट वाचताच बच्चन यांनी होकार भरला. (Photo Credit - Social Media)
चांगली गोष्ट म्हणजे लोकांना हा चित्रपट खूप आवडला. या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन यांना चांगल्या कामाच्या ऑफर येऊ लागल्या आणि बच्चन कुटुंबाचे आयुष्य रुळावर आले. (Photo Credit - Social Media)
पण अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात सर्वात मोठा बदल, त्यावेळी घडला जेव्हा कौन बनेगा करोडपती हा शो होस्ट केला. हा शो करू नको यासाठी बर्याच लोकांनी अमिताभवर दबाव आणला होता. कारण, त्यावेळी मोठ्या पडद्यावरील कलाकार टीव्ही कार्यक्रमांमध्ये दिसत नव्हते. आणि दोन्ही इंडस्ट्रीमध्ये मोठी तफावत होती. (Photo Credit - Social Media)
मात्र, अमिताभ यांनी कोणाचेच ऐकलं नाही, त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं. त्यांचा निर्णय योग्य ठरला. बिग बी यांचं आयुष्य या शो नंतर पूर्णपणे बदलले. आज ते ज्या यशाच्या शिखरावर आहेत, तिथं जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, प्रत्येकालाच तिथं जाता येतं असं नाही. (Photo Credit - Social Media)
अमिताभ यांच्या यशात त्यांच्या कुटुंबियांचा मोठा वाटा आहे. (Photo Credit - Social Media)