गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल...; हिना खानच्या महाराणी वाईब्स, अदांनी चाहते घायाळ
![गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल...; हिना खानच्या महाराणी वाईब्स, अदांनी चाहते घायाळ गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल...; हिना खानच्या महाराणी वाईब्स, अदांनी चाहते घायाळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/11/a8dcb56d98d1dff5426c82e3d06331a5e2681.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
हिना खान टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री आहेच, पण त्यासोबतच तिची गणना हाइएस्ट पेड अभिनेत्रींमध्येही केली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App![गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल...; हिना खानच्या महाराणी वाईब्स, अदांनी चाहते घायाळ गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल...; हिना खानच्या महाराणी वाईब्स, अदांनी चाहते घायाळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/11/2c26c448d0f33bec7a0c7b0785d5885438e16.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
काही दिवसांपूर्वी हिना खानला कर्करोगाचं निदान झालं होतं. सध्या ती उपचार घेत आहे. पण, अशा कठीण प्रसंगी अभिनेत्री आपलं आयुष्य एन्जॉय करत आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं आपल्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. सध्या हे सर्व फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहेत.
![गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल...; हिना खानच्या महाराणी वाईब्स, अदांनी चाहते घायाळ गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल...; हिना खानच्या महाराणी वाईब्स, अदांनी चाहते घायाळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/11/ab7c80b8b50458982f2d3aa0ff85b640e8a9c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
हिना खाननं आपल्या महाराणी लूकचे क्लासी फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये हिना खान ट्रेडिशनल लूकमध्ये दिसून येतेय.
या फोटोंमध्ये हिना खाननं गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. यलो ब्लाऊजसोबत हिनानं ही साडी मॅच केली आहे.
फोटोंमध्ये हिना खान जमिनीवर बसून दिवे लावताना दिसत आहे. प्रत्येक फोटोमध्ये तिचा लूक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
अभिनेत्रीनं आपला दिलकश लूक ग्लॉसी मेकअप, कानतील मोठाले झुमके आणि कपाळावर टिकली लावून पूर्ण केला आहे.
हिना खानचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यावर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
हिनानं साडीतील फोटो शेअर करत कॅप्शन लिहिलं आहे की, साडीतील सदाबहार सौंदर्य...
दरम्यान, हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरच्या स्टेज थ्रीवर आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.
हिना खाननं आपल्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजन शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' पासून केली होती. ज्यामध्ये तिनं अक्षराची भूमिका निभावली होती.