Photo : श्वेता तिवारीची मुलगी Palak Tiwari आहे 21 वर्षांची, आई आणि मुलीतील वयाचं अंतर जाणून तुम्हाला वाटेल आश्चर्य!
Shweta Tiwari Palak Tiwari Age Difference: अभिनेत्री श्वेता तिवारीने आपल्या दुसर्या लग्नातून सुटका करून घेतल्यानंतर उत्तम पद्धतीने ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये पुनरागमन केले आहे. श्वेता तिवारी सोबत तिची मुलगी पलक तिवारी सुद्धा लाइमलाईट मध्ये आली आहे. (Photo:@shweta.tiwari/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्वेता तिवारी अनेकदा मुलांसोबत आऊटिंग करताना आणि सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसते. यातंच श्वेता आणि तिची मुलगी पलक यांच्या नात्याविषयी चर्चा सुरू होते. (Photo:@shweta.tiwari/IG)
या आई-मुलीच्या जोडीचे फोटो आणि व्हिडिओ काही मिनिटांतच इंटरनेटवर व्हायरल होतात. या दोघींना व्हायरल फोटो आणि व्हिडीओमध्ये पाहिल्यानंतर त्या कोणत्याही अँगलने आई आणि मुलगी दिसत नाहीत, बरेचदा चाहते त्यांना जुळ्या बहिणी म्हणतात. (Photo:@shweta.tiwari/IG)
श्वेता तिवारीने तिच्या वाढत्या वयाबरोबर स्वतःला कोणत्याही जुन्या वाईनसारखे प्रभावशाली बनवलंय. पलक तिवारी श्वेता आणि तिचा पहिला नवरा राजा यांची मुलगी आहे. 'कसौटी जिंदगी की' मधील प्रेरणाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या श्वेता तिवारीने 1998 मध्ये अवघ्या 18 व्या वर्षी राजा चौधरीशी लग्न केले होते. (Photo:@shweta.tiwari/IG)
श्वेता तेव्हा चित्रपटसृष्टीत एक सुप्रसिद्ध चेहरा बनली होती. राजाशी लग्न झाल्यानंतर दोन वर्षांनी श्वेताने 2000 साली मुलगी पलकला जन्म दिला. (Photo:@shweta.tiwari/IG)
त्यावेळी श्वेता स्वतः केवळ 20 वर्षांची होती आणि ती तिच्या कारकिर्दीत खूप चांगली कामगिरी करत होती. त्यामुळे हे स्पष्ट आहे की श्वेता आणि पलक यांच्यात फक्त 20 वर्षांचा फरक आहे. जो आई मुलीच्या दृष्टीने कमी आहे. (Photo:@shweta.tiwari/IG)
सहसा जिथे नायिका लग्न आणि कुटुंबनियोजनाला तिच्या कारकिर्दीत अडथळा मानते, तिथे श्वेता तिवारीने नवीन ट्रेंड सिद्ध केलाय आणि दोन मुलांनंतरही, ती ग्लॅमरच्या क्षेत्रात नवोदितांना कॉम्पिटिशन देत आहे. (Photo:@shweta.tiwari/IG)
श्वेता तिवारीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर 2007 मध्ये तिचा घटस्फोट झाला, तिने राजा चौधरीवर अनेक गंभीर आरोप केले. (Photo:@shweta.tiwari/IG)
त्यानंतर तिने 2013 मध्ये पुन्हा एकदा आयुष्यात सुधारणा केली आणि अभिनव कोहलीशी लग्न केले. श्वेता तिवारीला अभिनव कोहलीसोबत एक मुलगा आहे. मात्र, हे लग्नही फार काळ टिकले नाही आणि 2019 मध्ये श्वेताने अभिनववरही अनेक गंभीर आरोप केले. (Photo:@shweta.tiwari/IG)
सध्या, श्वेता दोन्ही मुलांसोबत तिच्या आयुष्याचा आनंद घेत आहे आणि पडद्यापासून फॅशन शो पर्यंत सर्व कार्यक्रमांमध्ये सक्रिय आहे. (Photo:@shweta.tiwari/IG)
(Photo:@shweta.tiwari/IG)