In Pics | Farhan Akhtar सोबत ब्रेकअप झाल्यानंतर Shraddha Kapoor म्हणाली...
'आशिकी 2' या चित्रपटात काम केल्यानंतर श्रध्दा कपूरचे नाव अभिनेता आदित्य रॉय कपूरशी जोडण्यात आलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआदित्य आणि श्रध्दाने त्यांच्यातील नात्याचा कधीही खुलासा केला नाही आणि ते आपापल्या कामात व्यस्त राहिले. 'आशिकी 2' नंतर ही जोडी 'ओके जानू' या चित्रपटात एकत्र आली.
त्यानंतर श्रध्दा कपूर चे नाव 'रॉक ऑन स्टार 2' फरहान अख्तरशी जोडण्यात आलं. मीडियाच्या रिपोर्ट्स नुसार, श्रध्दा आपल्या वयापेक्षा किती तरी मोठा असलेल्या फरहानच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर हे दोघे रिलेशनशीपमध्येही होते.
त्यांच्या या रिलेशनशीपवर श्रध्दा कपूर चे वडील शक्ती कपूर नाराज होते. त्यांनी या नात्याला विरोध केला. परिवारातून असलेल्या दबावामुळे श्रध्दा कपूरने आपले पाऊल मागे घेतले.
यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना श्रध्दा कपूर म्हणाली की, ब्रेकअप होणं खूप वेदनादायी असतं. त्यानंतर फरहानने आपले नाव श्रध्दा कपूरशी जोडण्यात आल्याच्या बातम्या या अफवा होत्या असं स्पष्ट केलं.