Shehnaaz Gill Saree Look : न्यू इयर पार्टीमध्ये स्टायलिश दिसायचंय? शहनाज गिलचे क्लासी लूक ट्राय करा

न्यू इयर पार्टीमध्ये स्टायलिश दिसायची प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी नक्की कोणता लूक करायचा हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे मिळेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तुम्ही पार्टीमध्ये स्टायलिश आणि क्लासी दिसण्यासाठी अभिनेत्री शहनाज गिलचे लूक ट्राय करु शकता. या लूकमध्ये तुम्ही फारच सुंदर दिसाल.

ऑफिसमध्येही पार्टी करत सर्वजण नवीन वर्ष साजरं करतात. अशा वेळी तुमचा लूक परफेक्ट असणं गरजेचं आहे.
बिग बॉस 13 मधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे शहनाज गिल. शहनाजने चाहत्यांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे.
या 'पंजाबच्या कतरिना कैफ'नं सर्वांनाच वेड लावलं आहे. शहनाजच्या प्रत्येक लूकवर चाहते फिदा होतात. तुम्ही न्यू इयर पार्टीसाठी शहनाजचे लूक ट्राय करु शकता.
ग्रे आणि पिंक फ्लोरल साडीतील शहनाजचा लूक तुम्ही ऑफीस पार्टासाठी ट्राय करु शकता. हा लूक सिंपल आणि तितकाच एलिगंट आहे.
स्ट्रप ब्लाऊज प्रिंटेड साडीसोबत चोकर नेकलेसची जोड शहजानने दिली आहे. यासोबत तिने डायमंड इअररिंग्सही घातले आहेत.
शहनाजने या लूकसोबत स्मोकी आय मेकअप केला आहे. डायमंड ब्रेसलेट आणि रिंगसह शहनाज या लूकमध्ये फारच स्टायलिश दिसत आहे.
त्या सोबतच शिमरी ब्लॅक साडीतील शहनाजचा लूकही फार ग्लॅमरस आहे. स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही या लूकला पसंती देऊ शकता.