'या' अभिनेत्री चाळीशी ओलांडूनही आहेत सिंगल, यादीत कोणाचं नाव आहे जाणून घ्या...
काही अभिनेत्रींबद्दल आहेत ज्या केवळ त्यांच्या अभिनयामुळेच नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवयाची 40 वर्षे पूर्ण केलेल्या या अभिनेत्री विवाहित नसून स्वत:च्या हिमतीवर यशस्वी स्वतंत्र जीवन जगत आहेत.
यामध्ये पहिला क्रमांक येतो अभिनेत्री शिल्पा शिंदेचा. शिल्पाने 'भाबी जी घर पर हैं' या टीव्ही मालिकेतील अंगूरी भाभीच्या भूमिकेतून लोकप्रियता मिळवली.
अभिनेत्री काजोलची धाकटी बहीण तनिषा मुखर्जी हिचंही अद्याप लग्न झालेलं नाही. 44 वर्षांची झालेली तनिषा बिग बॉसमध्ये झळकली होती.
शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण शमिता शेट्टी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये तिला हवी तशी ओळख निर्माण करु शकली नाही.
बिग बॉसमध्ये दिसलेली शमिता शेट्टी 43 वर्षांची असून तिने अद्याप लग्न केलेलं नाही.
'कहानी घर घर की' या टीव्ही मालिकेत दिसलेली साक्षी तन्वर टीव्ही इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे.
साक्षीने एक मुलगी दत्तक घेतली आहे. 49 वर्षांची साक्षी सिंगल मदर आहे.
तनिषाचं नाव अरमान कोहलीसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आले होते. मात्र, त्यांचं ब्रेकअप झालं.
कॉमेडी टीव्ही सीरियल 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम नेहा मेहता सुद्धा 43 वर्षांची असून सिंगल आहे.
प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झालेल्या या लोकप्रिय टीव्ही मालिकेत नेहाने अंजली भाभीची भूमिका साकारली होती.