In Pics : जिए तो जिए कैसे, बिन आपके...माधुरी दीक्षितसोबत ब्रेकअप झाल्यानंतर संजय दत्तला आलं होतं नैराश्य

Continues below advertisement

Feature_Photo_2_(6)

Continues below advertisement
1/7
'संजू' हा चित्रपट आल्यानंतर संजय दत्तच्या अफेअर्सची चर्चा जोरात सुरु झाली. संजय दत्तला 308 गर्लफ्रेंड होत्या असा खुलासा या चित्रपटात करण्यात आला होता. नव्वदच्या दशकात संजय दत्त आणि माधुरी दीक्षितच्या अफेअरच्या बातम्या या वर्तमानपत्रांच्या हेडलाईन असायच्या. त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला आणि संजय दत्त नैराश्यात गेला असं त्याच्या पहिल्या पत्नीने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
2/7
संजय दत्त आणि माधुरीची जोडी 'साजन' आणि 'खलनायक' या चित्रपटांच्या माध्यमातून एकत्रित दिसली. त्यावेळी या दोघांचे अफे्अर चालू असल्याची चर्चा होती.
3/7
हे दोघं नेहमी एकमेकांसोबत दिसायचे. चाहत्यांना या दोघांच्या लग्नाची आतुरता होती. पण हे काही शक्य झालं नाही.
4/7
संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा शर्मा ही कॅन्सरशी लढत होती, त्यावेळी तिने 'स्टारडम' ला एक मुलाखत दिली होती. त्यावेळी तिने सांगितलं की, ब्रेकअपनंतर संजयला इमोशनली सपोर्टची गरज होती.
5/7
ऋचा शर्माने सांगितलं की, माधुरी दीक्षितने संजयला सोडलं होतं त्यावेळी तो नैराश्यामध्ये गेला होता. प्रत्येक क्षणी त्याला भावनिक आधाराची गरज होती.
Continues below advertisement
6/7
ऋचा शर्माने सांगितलं की, संजय दत्त हा माधुरीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. त्यामुळे ब्रेकअप झाल्यानंतर त्याला काही सूचत नव्हतं.
7/7
1993 सालच्या मुंबई सिरियल ब्लास्ट नंतर टाडा आणि आर्म्स अॅक्ट अन्वये संजय दत्तला अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर त्याच्या आणि माधुरीच्या संबंधामध्ये दुरावा निर्माण झाला होता असं सांगितलं जातंय.
Sponsored Links by Taboola