Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
Saif Ali Khan Case Latest Update : अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. घटनेला 24 तासांहून अधिक काळ उलटून गेला असला तरी अद्याप हल्लेखोर मोकाट आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहल्लेखोराने सैफच्या पाठीत भोसकलेल्या चाकूचा अडीच इंचाचा तुकडा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन बाहेर काढला. डॉक्टरांनी बाहेर काढलेला तुकडा त्याच्या पाठीच्या कण्याच्या अगदी 2 MM जवळ होता, यामुळे त्याला पॅरालिसिस होण्याचा धोका होता.
सैफच्या मानेवर आणि हातावर जखम झाली होती, याशिवाय त्याच्या पाठीत धारदार चाकूचा तुकडा अडकला होता. तो शस्त्रक्रिया करुन डॉक्टरांनी बाहेर काढला.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांच्या हाती आता नवा पुरावा लागला आहे.
हल्लेखोर इमारतीत घुसतानाच सीसीटीव्ही फुटेज सापडलं आहे.
याआधी हल्लेखोर पळतानाही सीसीटीव्ही सापडला होता. आता आरोपी घरात घुसरातानाचा सीसीटीव्ही सापडला आहे.
आरोपी लपूनछपून पायऱ्यावरुन वर जाताना सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
16 जानेवारी रोजी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास सैफ अली खानवर हल्ला झाला.
16 जानेवारीला 1.37 वाजता आरोपी पायऱ्या चढून वरती जाताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.