Pushpa 2 Breaks Box Office Records: 'पुष्पा 2'नं बॉलिवूड-साऊथच नाहीतर, 'या' दोन हॉलिवूडपटांनाही चारली धूळ; बॉक्स ऑफिसवर खळबळ
सध्या जर कोणी क्या चल रहा है? असा प्रश्न विचारला, तर कोणीही एका फटक्यात सांगेल, पुष्पा 2 चल रहा है... सगळीकडे फक्त पुष्पा, पुष्पा आणि पुष्पाच... पुष्पाचं जणू चक्रीवादळ आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'पुष्पा 2 : द रूल' हा चित्रपट तयार करण्यासाठी 500 कोटी रुपये लागले आणि हे भांडवल या चित्रपटानं फक्त आणि फक्त चारच दिवसांत कमावलं आहे. अशातच या चार दिवसांत पुष्पानं सर्वांनाच पाणी पाजलं आहे.
Sacknilk नुसार, पुष्पा 2 नं भारतात अवघ्या 4 दिवसांत 500 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. गेल्या तीन दिवसांत या चित्रपटानं लिओ, पीके, संजू आणि जेलर या चित्रपटांच्या आयुष्यभराच्या कमाईपेक्षा जास्त कमाई केली होती.
चौथ्या दिवशी पुष्पा 2 नं ज्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले, ते सर्व चित्रपट आतापर्यंतचे ब्लॉकबस्टर मानले जातात. या यादीत दोन हॉलिवूड चित्रपटांचाही समावेश आहे.
अवतार द वे ऑफ वॉटर: जेम्स कॅमेरूनच्या चित्रपटानं 2022 मध्ये भारतात 391.4 कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाचा विक्रमही मोडला आहे.
Avengers Endgame: 2019 मध्ये, या Marvel चित्रपटानं भारतात 373.05 कोटी रुपयांची कमाई केली होती, जी आता पुष्पा 2 च्या मागे आहे.
दंगल: आमिर खानचा ऑल-टाईम ब्लॉकबस्टर चित्रपट 2016 मध्ये रिलीज झाला होता, ज्यानं सकनील्कच्या मते भारतात 387.38 कोटी रुपये कमावले होते. हा चित्रपटही पुष्पा 2 च्या मागे पडला आहे.
सालार सीझफायर पार्ट 1: 2023 साली रिलीज झालेल्या प्रभासच्या या चित्रपटानं 406.45 कोटींची कमाई केली होती. पुष्पा 2 नं त्याचं लाईफटाईम कलेक्शन देखील पार केलं आहे.
2.0 : रजनीकांत, अक्षय कुमारच्या या चित्रपटानं 2018 मध्ये 407.05 कोटींची कमाई केली होती. त्याचा विक्रमही चौथ्या दिवशी मोडला आहे.
बाहुबली: प्रभास आणि एसएस राजामौली यांच्या चित्रपटानं 2015 मध्ये म्हणजेच, 9 वर्षांपूर्वी 421 कोटी रुपयांची कमाई केली होती. आता त्याचं लाइफटाईम कलेक्शन देखील पुष्पा 2 नं मागे टाकले आहे.