Priya Bapat: साडीत खुललं प्रियाचं सौंदर्य; फोटोवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा!
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतेच प्रियानं तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
व्हाईट फ्लॉवर प्रिंट असलेली पिंक कलरची साडी आणि कानात पिंक आणि व्हाईट स्टोनचे इअरिंग्स अशा लूकमधील फोटो प्रियानं शेअर केले आहे.
प्रियाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
प्रियाच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.प्रियाच्या या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
प्रियानं हे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, ' COD season 3 is streaming NOW'
प्रिया ही लवकरच सिटी ऑफ ड्रीम्स या सीरिजच्या तिसऱ्या सिझनमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच प्रियानं बॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे.