Photo: गर्लफ्रेन्ड हो, तुला आलिशान घर देतो; सुकेश चंद्रशेखरची नोरा फतेहीला ऑफर
जॅकलिन फर्नांडिस लाईनमध्ये आहे, पण मला तुलाच गर्लफ्रेन्ड बनवायचं आहे असा निरोप सुकेश चंद्रशेखरने पाठवला असल्याचं नोरा फतेहीने तिच्या कोर्टात दिलेल्या जबाबात म्हटलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुकेश चंद्रशेखर कोण आहे हे माहिती नव्हतं, पहिल्यांदा ईडीच्या कार्यालयात त्याला पाहिल्याचंही नोराने आपल्या जबाबात म्हटलं आहे. या आधी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने सुकेश चंद्रशेखरच्या विरोधात जबाब नोंदवला आहे.
बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही सुकेश चंद्रशेखर विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात साक्षीदार बनली आहे. मंगळवारी नोरा फतेहीने दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात तिचा जबाब नोंदवला आणि त्या दरम्यान तिने सुकेश चंद्रशेखरवर गंभीर आरोप केले.
image 4
नोराने तिच्या जबाबात दावा केला की सुकेशला तिला आपली मैत्रीण बनवायचे होते आणि त्या बदल्यात तिला मोठे घर आणि आलिशान लाईफस्टाईलची ऑफर दिली होती.
नोरा फतेहीने तिच्या जबाबात सांगितलं की, पिंकी इराणीने तिच्या चुलत बहिणीशी संपर्क साधला होता. त्यावेळी सुकेश चंद्रशेखरने तिच्याकडून निरोप दिला होता की, जॅकलिन फर्नांडिस सुकेशची गर्लफ्रेन्ड बनण्यासाठी तयार आहे, पण त्याला नोरा फतेहीला गर्लफ्रेन्ड बनवायचं आहे.
सुकेश चंद्रशेखरसोबत राहण्यासाठी अनेक अभिनेत्री आतुर असतात अशीही माहिती पिंकी इराणीने दिली. त्यावेळी सुकेशबद्दल काहीच माहिती नव्हती असं नोरा फतेहीने सांगितलं.
नोरा फतेही म्हणाली की, 'सुरुवातीला मला सुकेश कोण हे माहीत नव्हते. नंतर मला कळले की तो एलएस कंपनीत काम करतो. माझा त्याच्याशी कोणताही वैयक्तिक संपर्क नव्हता किंवा मी कधीही त्याच्याशी संपर्क साधला नाही.
नोरा फतेहीने कोर्टात सांगितले की, तिने सुकेश चंद्रशेखरला पहिल्यांदा ईडीच्या कार्यालयात पाहिले होते.
नोरा फतेहीने न्यायालयात दावा केला की, खंडणी प्रकरणी ईडीने तिला समन्स पाठवले तेव्हा सुकेश चंद्रशेखर हा ठग असल्याचं तिला समजलं.
मला याबद्दल कोणतीही माहिती नव्हती आणि मी त्याला कधीही भेटले नाही, सुकेश आणि मी ईडी ऑफिसमध्ये समोरासमोर आलो तेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिलं असं नोराने आपल्या जबाबात म्हटलं.