Photo: कधी केमिस्ट तर कधी वॉचमन, पैसे नसल्याने नवाजुद्दीन सिद्दीकीने केली 'ही' कामं
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या त्याच्या अभिनयासाठी फेमस आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक चित्रपट आणि वेब सीरिजमधून नवाजुद्दीनने त्याच्या अभिनयाची छाप सोडली आहे.
आज यशाच्या शिखरावर असलेल्या नवाजुद्दीनने मोठं स्ट्रगल केलं आहे. सुरुवातीला त्याने पेट्रोकेमिकल कंपनीमध्ये केमिस्टचे काम केलं.
त्यानंतर तो एनएसडीमध्ये गेला. काम शोधताना खर्च निघावा म्हणून त्याने वॉचमनचं काम केलं.
नवाजुद्दीन शूल आणि सरफरोश या चित्रपटांमध्ये छोट्या रोलमध्ये दिसून आला.
पीपली लाइव, गँग्स ऑफ वासेपूर आणि द लंचबॉक्स या चित्रपटातील अभिनयाने त्याला वेगळी ओळख दिली. नवाजुद्दीननं अनेक चित्रपटांसाठी कोट्यवधींचे मानधन घेतलं आहे.
नवाजुद्दीन आता'लक्ष्मण लोपेज'(Laxman Lopez) या इंग्रजी भाषेतील चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या गँग ऑफ वासेपूर, मंटो या चित्रपटांना आणि सेक्रेड गेम्स या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली.