Movie Release in 2023: पठाण ते टायगर-3 ; हे बिग बजेट चित्रपट 2023 मध्ये होणार प्रदर्शित
शाहरुख खान, जॉन अब्राहम, दीपिका पदुकोण अशी तगडी स्टार कास्ट असणारा 'पठाण' हा चित्रपट जानेवारी 2023 मध्ये रिलीज होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App12 जानेवारी 2023 रोजी आदिपुरुष हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये प्रभास, क्रिती सेनन प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांचा रॉका और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट देखील पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.
दिग्दर्शक अॅटलीचा जवान हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार असून या चित्रपट शाहरुख खान प्रमुख भूमिका साकारणार आहे.
21 एप्रिल 2023 रोजी सलमान खानचा टायगर-3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कतरिना कैफ देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे.
अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता पुढच्या वर्षी पुष्पा-2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
रणबीर कपूरचा अॅनिमल चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. या चित्रपटार रणबीरसोबतच रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि परिणीति चोप्रा प्रमुख भूमिका साकारणार आहे.
द आर्चीज हा चित्रपट 2023 च्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात सुहाना खान, खुशी कपूर प्रमुख भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन जोया अख्तरनं केलं आहे.